Maharashtra Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे बंधुंचा मुंबईत आज 'गर्जना' मोर्चा

Political Breaking Live Headlines Updates : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे बंधुंचा मुंबईत आज गर्जना मोर्चा, यासह राज्य आणि देशभरातली महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

निवडणूक आयोग आणि भाजपची अभद्र युती - नाना पटोले

निवडणूक आयोगाने SIR च्या माध्यमातून ज्या गडबडी केल्या आहेत, त्याची वस्तुस्थिती आता जनतेसमोर आलेली आहे. ज्ञानेश कुमार, नरेंद्र मोदी आणि भाजपची जी अभद्र युती होती, ती लोकशाहीची रोज हत्या करीत होती. त्याच्या विरोधात जे जे लोक मैदानात उतरतात, त्या सगळ्यांच्या सोबत प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष काँग्रेस पक्ष आहे, असं वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलं आहे.

बिन्यामिन नेतान्याहू यांच्याकडून कॅप्टन स्मित मच्छार यांना इस्रायलच्या स्वातंत्र्यदिनाचं निमंत्रण

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी कॅप्टन स्मित मच्छार यांना इस्रायलच्या आगामी स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी अधिकृतपणे आमंत्रित केलं आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील त्यांनी आमंत्रित केलं आहे. बिन्यामिन नेतान्याहू यांनी इस्रायलच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यादरम्यान कॅप्टन मच्छार आणि नरेंद्र मोदी यांना संयुक्तपणे उत्सव ज्योत प्रज्वलित करण्यासाठी आमंत्रित केलं आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जळगाव जिल्हा दौऱ्यावर

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत. त्यानंतर एरंडोल तालुक्यातील दुष्काळ भागाचे पाहणीसाठी निघणार आहे.

अभिजीत दिपके यांनी अमेरिकेतच आंदोलन करावे - आठवले

कॉक्रोच जनता पार्टीला आंदोलन करण्याचा अधिकार आहे; मात्र या पक्षाची स्थापना अमेरिकेत झाली असल्याने अभिजीत दिपके यांनी अमेरिकेतच आंदोलन करावे, असा टोला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिपके यांना लगावला आहे.

राहुल गांधींचा एमपीएससी आंदोलानाला पाठिंबा, सरकारला दिला इशारा

पुण्यात मागील काही दिवसांपासून एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील गोंधळ आणि पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांनी MPSC आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावी ही प्रमुख मागणी या विद्यार्थी आंदोलकांची आहे. या आंदोलनाला आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील या आंदोलनावर भाष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट करत आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असल्याचं म्हटलं आहे. शिवाय विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणाऱ्या संस्थेवरच कब्जा केला गेला असून आम्ही हे असं चालू देणार नाही, असा इशारा देखील गांधी यांनी आपल्या पोस्टमधून सरकारला दिला आहे.

राज ठाकरे उद्या पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांची भेट घेणार

मनसेप्रमुख राज ठाकरे उद्या सोमवार सकाळी ते पुण्यात आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे बंधुंचा मुंबईत आज 'गर्जना मोर्चा'

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात आज ठाकरे बंधुंकडून मुंबईत गर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. गर्जना लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी असं या मोर्चाला नाव देण्यात आलं आहे. सकाळी १० वाजता मोर्चाला सुरुवात होणार असून मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com