Maharashtra Live Update : लॉजवर शीतपेयातून दारू पाजून विद्यार्थिनीवर अत्याचार; ईश्वरपूर पोलिसांनी केली दोघांना अटक

Political Breaking Live Headlines Updates : राज्यातील दुष्काळी परिस्थिती, विधान परिषदेच्या निवडणुका, जिल्हा बँकेच्या निवडणुका, एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासह राज्य आणि देशभरातली महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर....
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

Sangali Crime : लॉजवर शीतपेयातून दारू पाजून विद्यार्थिनीवर अत्याचार; ईश्वरपूर पोलिसांनी केली दोघांना अटक

सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथील कामेरी रस्त्यावरील एका लॉजवर नेऊन शीत पेयातून दारू पाजून महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या वीस वर्षे विद्यार्थिनीवर दोघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाळवा तालुक्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पीडित विद्यार्थिनी पर जिल्ह्यातील असून येथे शिक्षण घेत होती. पीडित विद्यार्थ्यानीने ईश्वरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Raigad BIG Update : रायगडच्या म्हसळ्यातील गायरोण गाव अध्यक्ष पती-पत्नीने स्वतः कुदळ-फावडे घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवले

वारंवार तक्रार करून प्रशासन लक्ष देत नसल्याने गाव अध्यक्ष आणि त्याच्या पत्नीने हातात कुदळ-फावडे घेत गावच्या रस्त्यावरील खड्डे बुजवले. रायगडच्या म्हसळा तालुक्यातील गायरोणे या गावात जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्डे आणि चिखलामुळे गावकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शाळकरी मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच या रस्त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणीच दखल घेत नसल्याने अखेर गायरोणे गावचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी स्वतः आणि त्यांच्या पत्नीने हातात कुदळ-फावडे घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केले. त्यांच्या या कृतीचे जोरदार कौतुक होत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेचे वाभाडे काढले जात आहेत.

Sanali Update : मिरज रुग्णालयाची कमान कोसळली; ठेकेदार, रुग्णालय अधिष्ठाता व विभागीय अभियंत्यावर गुन्हा दाखल करा

सांगलीच्या मिरजेतील शासकीय रुग्णालयाची कमाल कोसळल्या प्रकरणी ठेकेदार व संबंधित दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप स्वाभिमानी आंबेडकरी संघटनेचे नेते डॉ. महेशकुमार कांबळे यांनी केला आहे. प्रशासनाने यांच्यावर गुन्हे दाखल न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कांबळे यांनी दिला आहे.

Crime News : पिंपरी दुमाल्यात चोरांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन घरे फोडली

शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला परिसरात मध्यरात्री चोरांनी तीन घरे फोडली. रोख रकमेसह वस्तूंची चोरी झाल्याचे समोर आले आहे. एकाच रात्री तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. काही घरांतून रोख रक्कम, तर काही ठिकाणांहून इतर वस्तू चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे. आधीच दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांसमोर आता चोरीच्या घटनांचं संकट उभं राहिलं आहे. चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी तातडीने तपास करावा आणि रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Raigad Politics : आमदार महेंद्र दळवी अन् अनिकेत तटकरे यांच्यात जुंपली

रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये अजूनही खटके उडत असून आलबेल नसल्याचे चित्र आहे. विकास कामांच्या श्रेयावरून एकनाथ शिंदे शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांना लक्ष्य केले होते. आपण निधी दिलेला असताना उद्घाटन तटकरेंनी केले, त्या कार्यक्रमाला सुद्धा बोलावलं नाही, असा टोला आमदार दळवींनी सुनिल तटकरे यांना लगावला. त्याला आमदार अनिकेत तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुका आल्या की तटकरे यांच्या पायाशी येतात, निवडणूक संपली की कोण तटकरे, असे विचारू लागतात. आमची जर मतदार संघात ताकद नसेल, तर आमच्यावर टीका करण्यात वेळ घालवण्यापेक्षा लोकांच्या विकासकामांकडे लक्ष द्या, असा सल्ला अनिकेत तटकरेंनी आमदार दळवींना दिला.

Vasai-Virar Municipal Corporation : विरार क्रीडा संकुल अन् नाट्यगृहाच्या उद्घाटनावरून भाजपविरुद्ध बहुजन विकास आघाडीत श्रेयवाद

विरारच्या क्रीडा संकुल आणि नाट्यगृहाच्या उद्घाटनावरून भाजप विरुद्ध बहुजन विकास आघाडी असा श्रेयवादाचा सामना रंगला आहे. उद्घाटनाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आपापसात भिडल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाला होता. दरम्यान, भाजपचे दोन आमदार आणि जिल्ह्याचे खासदार यांनी उद्घाटनावरून क्रीडा संकुलाच्या इमारतीच्या तळमजल्यात तब्बल पाच तास ठिय्या मांडला होता. यावेळी बहुजन विकास आघाडीचे महापौर अजीव पाटील यांनी शिष्टाचाराचा भंग केल्याचा आरोप खासदारांनी केला आहे. मात्र, “आम्ही कोणत्याही शिष्टाचाराचा भंग केलेला नाही,” असे महापौर अजीव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे.

Navi Mumbai : मानव विकास ट्रस्टच्यावतीने दुष्काळग्रस्तांसाठी 1 लाख 11 हजार 111 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा

नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात मानव विकास ट्रस्टच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत 'प्लास्टिकमुक्त महाराष्ट्र' अभियानाचा अधिकृत प्रारंभ करण्यात आला. यावेळी मानव विकास ट्रस्टने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाख 11 हजार 111 रुपयांची आर्थिक मदत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे धनादेशाद्वारे सुपूर्द केला.

Solapur Politics : शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळींविरोधात स्थानबद्धतेची कारवाई

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे सोलापुरातील उपनेते शरद कोळी यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. MPDA कायद्यानुसार शरद कोळी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आठवडाभरापूर्वीच शरद कोळी यांच्यावर MPDA कायद्यानुसार कारवाईचा आदेश जारी करण्यात आला होता. कारवाईचे आदेश जाहीर झाल्यापासून शरद कोळी पसार होते. मात्र सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कोळी यांना सांगलीतून ताब्यात घेतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com