Maharashtra Live Update : मुंबई पोलिसांवर प्रचंड ताण, 8 तास ड्युटीची अंमलबजावणी करा, संजय राऊतांची मागणी

Political Breaking Live Headlines Updates : शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. यासह राज्य आणि देशभरातली महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

मुंबई पोलिसांवर प्रचंड ताण, 8 तास ड्युटीची अंमलबजावणी करा, संजय राऊतांची मागणी

मुंबई पोलिसांवर प्रंचड ताण येत असून कागदोपत्री ८ तास काम दाखवले जात असताना प्रत्यक्षात मात्र वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांच्याकडून १२ तासांहून अधिक काळ काम करवून घेतले जाते. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात स्वत: लक्ष घालून मुंबई पोलिसांच्या ८ तास कामाच्या नियमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

यड्रावकर गटाला राष्ट्रवादीच्या कोट्यातून जागा देण्यास अंतर्गत विरोध

गोकुळ'च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला आणखी एक जागा हवी असल्याने या जागेवरून उमेदवार निश्चितीचा तिढा निर्माण झाला आहे. त्यात आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर गटाला राष्ट्रवादीच्या कोट्यातून जागा देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे; पण याला राष्ट्रवादीतूनच अंतर्गत विरोध आहे. शिवाय शिवसेनेतून देण्याला देखील विरोध आहे. दरम्यान, जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार डॉ. विनय कोरे परदेशात असल्याने आज महायुतीच्या नेत्यांची एकत्रित बैठक झाली नाही. डॉ. कोरे आज येणार असून, त्यानंतर ही बैठक होण्याची शक्यता आहे.

गांधी विद्या मंदिरचे विश्वस्त अपूर्व हिरे यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचा गंभीर आरोप

चार दिवसांपूर्वी शिक्षण मंत्री दादा भोसे यांनी हिरे कुटुंबीयांच्या शिक्षण संस्थेवर आर्थिक आरोप करणारी पोस्ट फेसबुक वर टाकली होती. त्यात आर्थिक घोटाळ्याचा उल्लेख केला होता. या पोस्टला अद्वय हिरे यांनी देखील तेवढ्यात सत्परतेने उत्तर देत शिक्षण मंत्र्यांचेच शिक्षण काढले होते. यानिमित्ताने पुन्हा एकदा हिरे आणि भुसे यांच्यातील राजकीय वादाला तोंड फुटले होते. त्याची परिणीती आणखी एका गुन्ह्यात पाहायला मिळाली. महात्मा गांधी विद्यामंदिर चे विश्वस्त डॉ अपूर्व हिरे यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

MPSC आंदोलकांना पुणे पोलिसांच्या नोटिसा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता पोलिसांच्या कारवाईची किनार लागली आहे. शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेली आंदोलने बेकायदेशीर असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, आंदोलनाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केल्याच्या कारणावरून २९ क्लास व अभ्यासिका चालकांसह ५१ विद्यार्थ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनावर पोलिसांचा रडार अधिकच तीव्र झाला आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दोन अपघात, महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक (कनेक्टिंग लिंक) वर आज पहाटे अवघ्या काही तासांच्या अंतराने झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

निवडणुकीपूर्वीच गोकुळमधील महायुतीचे मतभेद, मनभेद चव्हाट्यावर

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघाची निवडणूक सुरू असताना आता महायुती मधील मनभेद आणि मतभेद संपल्याची घोषणा मंत्री पाटील यांनी केली होती. मात्र महायुतीमध्ये किती मतभेद आणि मतभेद आहेत. हे एका गटाच्या प्रचारादरम्यान वाटण्यात आलेल्या पत्रकावरून समोर येत आहे. मागील पाच वर्षाच्या सत्ता काळात गोकुळ मधील कथित गैरकारभाराच्या प्रसिद्धी माध्यमात आलेल्या बातम्यांचा लेखाजोखा या पत्रकातून मांडला आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांसह सभासद आणि नेत्यांमध्ये देखील या पत्रकाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी आणखी कोणाचे अर्ज दाखल केले जाणार का? याबाबतचे चित्र आज स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com