Maharashtra Politics Live Update : लाडक्या अभिनेत्याला अखेरचा दिला जातोय अखेरचा निरोप

Political Breaking Live Headlines Updates : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन,विधान परिषद आणि जिल्हा बँकेच्या निवडणुका, पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, दिल्लीत काँग्रेस राहुल गांधींचे आज आंदोलन यासह राज्य आणि देशभरातली महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama
Published on: 
Updated on: 

लाडक्या अभिनेत्याला अखेरचा दिला जातोय अखेरचा निरोप

नाना पाटेकर यांना डोणजे गावातील त्यांच्या नानाची वाडी येथे अखेरचा निरोप दिला जात आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळे, रामदास आठवले यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,सुनेत्रा पवार,मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह विविध मान्यवर नानांना निरोप देण्यासाठी आले होते. तसेच पाटेकरांवर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे.

नाना पाटेकर यांचं पार्थिव डोणजे येथील नानाची वाडी येथे आणलं, थोड्याच वेळात अंत्यसंस्कार 

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं पार्थिव काही वेळापूर्वी डोणजे गावातील त्यांच्या नानाची वाडी येथे आणण्यात आलं आहे.त्यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांनी नाना पाटेकरांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना पुणे विमानतळावर राज्य सरकारतर्फे त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत पुष्पचक्र अर्पण करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केल्याची माहिती फडणवीसांनी सोशल मीडियावरुन दिली आहे.

'नाना पाटेकरांसारखा माणूस पुन्हा होणार नाही...': अण्णा हजारेही  गहिवरले 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही अभिनेते नाना पाटेकरांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, बोलताना त्यांना गहिवरुन आलं. त्यांनी नाना पाटेकरांचं कार्य एखाद्या दीपस्तंभासारखं असून त्यांनी फार मोठं काम केल्याचं सांगितलं. तसेच असा माणूस पुन्हा होणार नसल्याचं सांगत पाटेकरांना श्रद्धांजली वाहिली आहे.

भाजप खासदार कंगना रनौत यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव, केली महत्त्वाची मागणी 

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कंगनानं बुधवारी(ता.7ऑक्टोबर) हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.या याचिकेत कंगना रनौतने पूर्वपरवानगीशिवाय तिचे फोटो, आवाज यांसह एआय-निर्मित फोटो वापरण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

GST News : अधिकाऱ्यांना असलेले अटक करण्याचे अधिकार पूर्णपणे रद्द

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या भारत मंडपम येथील जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत व्यापारी आणि उद्योग जगतासाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. जीएसटी नियमांचे पालन सुलभ करण्यासाठी आणि कायदेशीर विवाद कमी करण्यासाठी या बैठकीत कौन्सिलने जीएसटी कायद्यांतर्गत अधिकाऱ्यांना असलेले अटक करण्याचे अधिकार पूर्णपणे रद्द केले आहेत. या निर्णयामुळे देशभरातील व्यावसायिक आणि उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद व मनाला वेदना देणारी आहे. उत्कृष्ट अभिनय, सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून नाना पाटेकर सदैव आपल्या स्मरणात राहतील. नाना पाटेकर यांच्या निधनाने कला आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

महायुतीमध्ये जागा वाटपात धुसफूस, राष्ट्रवादी काँग्रेसला

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरुन महायुतीमध्ये मोठी धुसफूस सुरू आहे. अनेकांना आपल्या उमेदवारीची खात्री झाल्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र जनांना डावलण्याचा अंदाज आला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी डावलल्यामुळे माजी संचालक प्रा. किसन चौगले यांनी काँग्रेसची वाट धरली आहे. त्यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची भेट घेतल्यानंतर यांना समविचारी आघाडीतून उमेदवारी जाहीर केलीय.

गुटखा तस्कराविरोधात नंदुरबारमध्ये एफडीएची मोठी कारवाही; 69 लाखांचा गुटखा आणि आयशर ट्रक जप्त

नंदुरबारमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या विमल पान मसाला आणि वी 1 तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे. ही कारवाई सुमारास नंदुरबारच्या करण चौफुली ते जकातफाटी रस्त्यावर करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे, एफ डी ए पथकाने धुळ्याकडे जाणारे आयशर वाहन अडवून तपासणी केली. यात 39 लाख 47 हजार 150 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि 30 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण 69 लाख 69 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाहनचालक मोहम्मद हलीम आणि इतरांवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किसान सभेच्या राज्य अधिवेशनात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा!

अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य २४व्या अधिवेशनाची कोल्हापूर येथे जोरदार आंदोलनाच्या घोषणेसह यशस्वी सांगता झाली. यावेळी दुष्काळ, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी, देवस्थान इनाम वर्ग-३, वनजमीन, गायरान व वरकस जमीन, पीक विमा आदी प्रश्नांवर राज्यव्यापी निर्णायक आंदोलन उभारण्याचा निर्णय अधिवेशनात घेण्यात आला. या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथून मुंबईच्या दिशेने शेकडो वाहनांचा राज्यव्यापी वाहन लॉंग मार्च काढण्याची घोषणा करण्यात आली.

नाना पाटेकर यांच्या निधनाचा वृत्त दुखद आणि धक्कादायक - अशोक चव्हाण

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचा वृत्त दुःखद आणि धक्कादायक आहे अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. मराठी, हिंदी सिनेमा, रंगभूमी, नाटक सर्व क्षेत्रात नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सामाजिक क्षेत्रात देखील त्यांनी मुलाचं काम केलेल आहे. महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीत लक्ष घालून त्यांनी ग्रामीण भागात अनेक काम केली. अचानक त्यांची एक्झिट मनाला न पटणारी बाब आहे अस अशोक चव्हाण म्हणाले.

कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर कारवाई; बदललेल्या शेकडो सायलेन्सरवर फिरवला बुलडोझर

बुलेट आणि इतर काही दुचाकी वाहनााच्या सायलेन्सरमध्ये बदल करून रस्त्यावर कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या वाहनांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागाने कारवाई केली आहे. कारवाईत काढण्यात आलेल्या बदललेल्या सायलेन्सरवर बुलडोझर फिरवून ते नष्ट करण्यात आले.

नंदुरबार जिल्ह्यात चारा वाहतूक आणि विक्रीस बंदी...

नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ घोषित केल्याने, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी जिल्ह्यातून परजिल्ह्यात आणि परराज्यात चारा वाहतूक व विक्रीस बंदी घातली आहे. पावसाच्या कमतरतेमुळे जिल्ह्यात चारा टंचाईची शक्यता असून, पशुधनाचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

अमरावतीत शेतकऱ्यांना दिलासा; मुख्य कालव्यात सोडले पाणी, तूर-कपाशीला मिळणार आधार

अमरावतीत खरिपातील तूर आणि कपाशी पिकांना पाण्याचा आधार मिळाला आहे. अप्पर वर्धा धरणातून मुख्य कालव्यात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येण्याची शक्यता आहे. पाण्यामुळे सध्या तग धरलेल्या तूर आणि कपाशी पिकांना मोठा फायदा होणार असून, शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

नागपुरात ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन; आंदोलक बॅरिकेड्सवर चढले

नागपुरातील व्हेरायटी चौकात इंडिया आघाडीच्या मित्र पक्षांकडून ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत बॅरिकेड्सवर चढण्याचा प्रयत्न केला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जाणार आहे. पोलिसांकडून मोर्चा नेमका कुठे रोखला जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ज्ञानेश कुमारांविरोधात नागपुरात आंदोलन; अनिल देशमुखांचा भाजपवर गंभीर आरोप

नागपुरातील व्हेरायटी चौकात ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी अनिल देशमुख यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करत त्यांना “BJPची बाहुली” म्हटले. आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा काढणार असून, पोलिसांकडून हा मोर्चा नेमका कुठे रोखला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या सुरक्षेत वाढ; दिल्लीसह मूळ गावीही कडेकोट बंदोबस्त

सध्या सुरू असलेल्या विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीतील निवासस्थान आणि कार्यालयासोबतच उत्तर प्रदेशातील त्यांच्या मूळ जिल्ह्यातील घराबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांना आधीपासून Z श्रेणीची सुरक्षा असून, आता निमलष्करी दलाची अतिरिक्त तैनाती केली जाणार आहे.

दुष्काळात तात्पुरत्या उपाययोजना नकोत, अण्णा हजारेंची सरकारला सूचना

दुष्काळात तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता राज्य सरकारने जलसंधारणाच्या कामांना अधिक प्राधान्य द्यावे, अशी सूचना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना केली आहे.

चित्रपटसृष्टीतील नाना पाटेकर यांचे योगदान अथांग होते-  पंतप्रधान मोदी

नाना पाटेकर यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांनी नानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. श्री नाना पाटेकर यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेत अष्टपैलूत्व आणि सर्जनशीलता आणली आणि आपल्याला अशी अजरामर पात्रे दिली जी पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवतील. ते त्यांच्या स्पष्ट आणि रोखठोक मतांसाठीही ओळखले जात होते. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील नाना पाटेकर यांचे योगदान अथांग होते. त्यांच्या जाण्याने कलाविश्वात कधीही न भरून निघणारी एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे, असं म्हणत मोदी यांनी नाना यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Nana Patekar Death Live Updates : नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार

जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे निधन झालं असून त्यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

नाना पाटेकरांची ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक

ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी आहे. मन प्रचंड दुःखी आहे. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते, अशी भावूक श्रद्धांजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांना अर्पण केली.

मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व, समाजकारणाची मोठी हानी - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड, दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावणारी आहे. त्यांच्या जाण्याने मराठी तसेच भारतीय कलाविश्वाने एक हरहुन्नरी आणि संवेदनशील कलाकार गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

​आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, "नाना पाटेकर हे केवळ एक उत्कृष्ट अभिनेते नव्हते, तर अभिनयाचा अस्सल आविष्कार आणि संवेदनशील सामाजिक जाणिवांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने त्यांनी अनेक व्यक्तिरेखा अजरामर केल्या. 'नटसम्राट', 'क्रांतिवीर', 'परिंदा' यांसारख्या कलाकृतींमधून त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर उमटवलेली अमीट छाप रसिकप्रेक्षकांच्या मनात सदैव कायम राहील."

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज सकाळी निधन झाले. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी गोव्यात अखेरचा श्वास घेतला.गोव्यातील डोना पावलामधील घरी असताना त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीनं मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.