Maharashtra Politics Live Update : पुर्णेकर हत्येप्रकरणी ठाण्यात आज सर्वपक्षीय मोर्चा

Political Breaking Live Headlines Updates : प्रदीप पुर्णेकर हत्येप्रकरणी आज ठाण्यात सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे दिल्लीत आजही इंडिया आघाडीच्या आंदोलनाची शक्यता आहे, यासह आज दिवसभरातील विविध राजकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

मुंबई महापौरांच्या यांच्या सोशल मिडीयाच्या खर्चाचा प्रस्ताव अखेर मंजूर

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सोशल मिडीयाच्या खर्चाचा प्रस्ताव अखेर मंजूर करण्यात आला आहे. महापौरांच्या प्रसिद्धीवर पालिका 25 लाख रुपये खर्च करणार आहेत.

INDIA आघाडीच्या आंदोलनात अनुपस्थित असलेल्या काँग्रेस खासदारांवर हायकमांड नाराज

दिल्लीतील INDIA आघाडीच्या आंदोलनात अनुपस्थित असलेल्या खासदारांना पक्षाने फोन करत सुनावले खडेबोल सुनावल्याची माहिती समोर आली आहे.

शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथ भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू

शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथ भीषण अपघात झाला असून या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दांपत्यासह चौघांचा जागीच मृत्यू, शेतकरी महिलेसह तरुणाचाही मृतांमध्ये समावेश आहे. हेरवाडवरून कुरुंदवाडच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने तीन दुचाकींना धडक दिल्याने हा अपघात घडला.

पुर्णेकर हत्येप्रकरणी ठाण्यात आज सर्वपक्षीय मोर्चा

ठाण्यात आज ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी प्रदीप पुर्णेकर हत्येप्रकरणी आज ठाण्यात सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

विठ्ठल मंदिर समितीची मुख्यमंत्री सहायता निधीस दोन कोंटीची मदत

पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने महाराष्ट्रातील दुष्काळासाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीस दोन कोंटीची मदत दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com