Maharashtra Political Updates : राज ठाकरेंची भाषणं असतात भारी, पण कामाच्या नावाने पाटी कोरी - रामदार आठवले

Maharashtra Breaking News Today : आज महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस, यासह 02 जानेवारी 2026 यासह राज्य आणि देशभरात दिवसभरात घडणाऱ्या सर्व राजकीय आणि सामाजिक घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Political Live updates
Maharashtra Political Live updatesSarkarnama

'राज ठाकरेंची भाषणं असतात भारी, पण कामाच्या नावाने असते पाटी कोरी...'

'राज ठाकरेंची भाषणं असतात भारी, पण कामाच्या नावाने असते पाटी कोरी. नुसत्या सभा गाजवून लोकांची पोटं भरत नाहीत, आणि समस्या सुटत नाहीत. आम्ही आठवड्याला ६००-७०० लोकांना भेटतो, सुख-दुःखात धावून जातो, म्हणूनच मुंबईकरांच्या हृदयात आम्हीच वसतो. राज ठाकरेंचा आणि संविधानाचा मेळ बसत नाही, आणि उद्धवजींना हे गणित कसं काय दिसत नाही ? ज्यांनी आंबेडकरी समाजाकडे दुर्लक्ष केलं, त्यांचं राजकारण आता संपत आलं. तुम्ही कितीही करा युती, पण मुंबईत पेटणार नाही तुमची पणती,' अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

तुम्ही वर्षाला एक पक्ष बदलताय. मोरेंनी काय व्यक्तव्य केलेत ते महाराष्ट्राने पाहिलंय - हाके

भाजप समर्थक, हिंदुत्ववादी संघटनांकडून झालेल्या टोकाच्या विरोधामुळे अखेर पूजा मोरे यांना पुणे महानगरपालिकेसाठी दाखल केलेली उमेदवारी मागे घ्यावी लागली. त्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुजा मोरे यांच्यावर जोरदार टीका केली. 'तुम्ही वर्षाला एक पक्ष बदलताय. पूजा मोरेंनी काय व्यक्तव्य केली आहेत ते महाराष्ट्राने पाहिलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटनेपासून, संभाजी ब्रिगेड ते स्वराज्य पक्षापर्यंत फिरून झाल्यानंतर कमाळावर निवडणूक लढायला निघालाय? आधी यांना ओबीसीमधून उमेदवारी पाहिजे होती. पण ती मिळाली नाही म्हणून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. मात्र जनता सजग आहे.', असं म्हणत त्यांनी मोरे यांच्यावर निशाणा साधला.

Nagpur : नागपुरमध्ये काँग्रेस नेते संजय सरायकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

नागपुरमधील काँग्रेस नेते संजय सरायकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत संजय सरकार यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

महापालिका निवडणुकीसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज्यभरात बंडखोरांच्या भूमिकेकडे लक्ष सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com