Maharashtra Politics Update :कुठलाही आमदार कुठेही जाणार नाही : संजय गायकवाड

Marathi Politics Headlines Updates: रविवार 23 नोव्हेंबर 2025 रोजीच्या राज्यासह देशभरातील विविध राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊयात.
Maharashtra Political Live updates
Maharashtra Political Live updatesSarkarnama

Sanjay Gaikwad : कुठलाही आमदार कुठेही जाणार नाही

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शिंदे गटाचे आमदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या. 'शिवसेना एक संघ आहे आणि एक संघ राहील, कुठलाही आमदार कुठेही जाणार नाही,' असे ते म्हणाले.

मी 30 वर्ष दापोलीतून हलत नाही - योगेश कदम

पणदेरी धरणाच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्यात राज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हणाले, “मी इथून तीस वर्षे हलत नाही; दापोली मतदारसंघाचा विकास पूर्ण होईपर्यंत माझी जागा अढळ आहे”

मनोहर बेहनवाल यांना मारहाण

माजी नगरसेविका शुभांगी बेहनवाल यांचे पती मनोहर बेहनवाल यांना बेदम मारहाण करण्यात आली. भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या रागातून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या पोषण आणि आरोग्यासाठी सामंजस्य करार

आंबेगाव तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव आणि न्यूट्रिशिअस अॅग्री फ्युचर इंडिया प्रा. लि. यांच्यामध्ये घोडेगाव प्रकल्पाअंतर्गत आदिवासी आश्रमशाळेतील मुलांकरीता अन्न सुरक्षा, पोषण आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याकरिता नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे.

संजयकाका पाटलांची वंचितसोबत युती

भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते, मात्र स्थानिक निवडणुकीत त्यांनी वेगळी चूल मांडली आहे, तासगाव नगर परिषदेसाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडी सोबत युती केली आहे.स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून ते निवडणूक लढत आहेत.

पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीची आत्महत्या

भाजप नेत्या पंकजा मुंडेचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. मात्र, ही आत्महत्या नाही तर हत्या असा आरोप तरुणीच्या कुटु्ंबीयांनी गर्जे कुटुंबावर आत्महत्या केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा यासाठी मुलीचे कुटुंबिय वरळी पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले आहेत.

Amit Thackeray : अमित ठाकरे नेरुळमध्ये शिवस्मारकाला अभिवादन करणार

मनसे नेते अमित ठाकरे आज नवी मुंबईतील नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. तसंच ते यावेळी शिवस्मारकाचे अनावरण केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याची नोटीस स्वीकारण्यासाठी ते नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये हजर राहणार आहेत.

माजी खासदार संजय काका पाटलांची 'वंचित'सोबत युती

स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून माजी खासदार संजयकाका पाटील हे तासगाव नगरपरिषदेची निवडणूक लढवत आहेत. यासाठी त्यांनी आता वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली आहे.

Eknath Khadse : खडसेंच्या घरातील चोरी प्रकरणी पोलिसांकडून आरोपीला अटक

⁠एकनाथ खडसेंच्या घरी चोरी करणाऱ्या बिलाल चौधरीला मुंबई पोलिसांनी अटक केली.विठ्ठलवाडी उल्हासनगर येथून अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

Solapur : जयकुमार गोरेंची प्रणिती शिंदेंवर टीका

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली. ज्यांनी आयुष्यभर फक्त टक्केवारी गोळा केली त्यांना उठता बसता फक्त टक्केवारीच दिसते, त्यांनी सांगितलेली कामं न झाल्याने बहुतेक त्यांची टक्केवारी बुडाली असेल, असं गोरे म्हणाले.

बावनकुळेंचं महसूल मंत्रीपदही कोणीतरी नावावर करुन घेईल - हर्षवर्धन सपकाळ

आमच्या नेत्यांकडे लक्ष देण्यापेक्षा सरकारी जमिनी लाटणाऱ्या माफियांकडे, मंत्रालयातल्या आपल्या कार्यालयात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराकडे लक्ष द्या. अजित पवारांचे चिरंजीव हजारो कोटींच्या सरकारी जमिनी नावावर करून घेत आहेत, तिकडे लक्ष द्या नाहीतर महसूल मंत्रीपद ही कोणीतरी नावावर करून घेईल, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com