BMC Election : आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं जागावाटप काल रात्री पूर्ण झाल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत दिली. 'भाजपा आणि शिवसेना महायुतीचे मुंबईतील जागावाटप पूर्ण झाले असून 137 जागा भाजप तर 90 जागा शिवसेना लढवणार आहे. महायुतीचे इतर घटकपक्ष यात समाविष्ट असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुंबईच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुंबईकरांचे जीवन सुकर करण्यासाठी विकासाची कामे कुणी केली, हे मुंबईकरांना चांगलेच ठावूक आहे. त्यामुळेच मुंबईकर महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि प्रचंड बहुमताने महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देतील, हा आम्हाला विश्वास आहे.' असं ट्विट फडणवीसांनी केलं आहे.