Maharashtra Political Live Update : शरद पवारांच्या सूचनेनंतर पुण्यातील तंटा मिटवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष मैदानात उतरणार

Sarkarnama breaking Updates : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) 21 डिसेंबर रोजी नियोजित असलेली ‘महाराष्ट्र गट ‘ब’ (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यासह राज्य आणि देशभरातील विविध राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

Mahavikas Aghadi: आघाडीचे नेते आज विधानसभाध्यक्ष सभापतींना भेटणार

विरोधी पक्षनेतेपदाबाबत महाविकास आघाडीचे नेते आज विधानसभाध्यक्ष, सभापतींना भेटणार आहेत. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी करणार आहेत.

आमदारांना आणि पक्षाला बदमान करणं हे दानेवेंचं काम - आमदार दळवी

ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टवर आता आता शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महेंद्र दळवी म्हणाले, आमदारांना आणि पक्षाला बदमान करणं हे दानेवेंचं काम आहे. त्यांनी पुरावे असतील तर ते सादर करावे त्याच्याशी माझा काही संबंध आढळला तर मी राजीनामा देईन. शिवाय विधीमंडळात मी हा प्रश्न उपस्थित करणार आहे.'

ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब

ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं की, 'या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे. जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?' दानवेंनी आपल्या ट्विटमुशे आता हे आमदार कोण आहेत? या चर्चांना आता उधाण आलं आहे.

शरद पवारांच्या सूचनेनंतर प्रदेशाध्यक्ष पुणे दौऱ्यावर येणार

पुणे शहरांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे पुणे दौऱ्यावर येणार असून या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावणार असल्याचं सांगितल्या जात आहे. दरम्यान शरद पवारांच्या सूचनेनंतर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष पुणे दौऱ्यावर येणार असून १९ आणि २० दोन दिवस प्रदेशाध्यक्ष पुण्यामध्ये ठाण मांडून असणार आहे. या दौऱ्या दरम्यान ते पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतील तसेच पक्षातील स्थानिक नेत्यांचं मत देखील जाणून घेणार आहेत.

Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन

पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नी काँग्रेस नेत्या नवज्योत कौर सिद्धू यांनी, 'काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी 500 कोटींची गरज असते', असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर आता नवज्योत कौर सिद्धू यांच्यावर काँग्रेस पक्षाने मोठी कारवाई केली आहे. त्यांचं काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहे.

MPSC ने 21 डिसेंबरची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) 21 डिसेंबर रोजी नियोजित असलेली ‘महाराष्ट्र गट ‘ब’ (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. आता ही परीक्षा 4 जानेवारी 2026 रोजी घेण्यात येणार आहे. राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदानाची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com