Maharashtra Live Politics Update : दोन सेवानिवृत्त अभियंत्यांवरील दंडाची कारवाई मॅटमध्ये रद्द!

Political Breaking Today Live Headlines Updates : ऊसाला साडेचार हजार रुपये हमीभाव देण्यात यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरू असलेले आंदोलन स्थगित, प्रफुल पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट यासह आजच्या राज्यभरातील विविध घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

शाळेतही आनंदाचा एक दिवा लावा, सीईओ रणजित यादव

शाळेने आपल्याला अक्षरओळख दिली, संस्कार दिले, स्वप्न पाहायला शिकवले आणि आयुष्याच्या वाटेवर चालण्याचे बळ दिले. आता त्या शाळेतील नव्या पिढीच्या स्वप्नांना बळ देण्याची वेळ आपली आहे. ही परतफेड नसून आपल्या मातीशी, शाळेशी आणि गुरुजनांशी असलेली कृतज्ञतेची नाळ जपण्याची संधी आहे. या दिवाळीत आपल्या घरासोबतच आपल्या शाळेतही आनंदाचा एक दिवा लावा, अशी भावनिक साद ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओ रणजित यादव यांनी घातली आहे.

Breaking news: नाशिक धर्मांतरण प्रकरणात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर निदा खान हिला आश्रय दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या ट्रॅव्हलचा साताऱ्यात भीषण अपघात

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात मसूरजवळ धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. दिवाळीच्या सुट्टीसाठी धुळ्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या या बसला मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या दुर्घटनेत तीन चालकांसह 12 प्रशिक्षणार्थी असे एकूण 15 जण जखमी झाले

दोन सेवानिवृत्त अभियंत्यांवरील दंडाची कारवाई मॅटमध्ये रद्द!

रोजगार हमी योजनेतील पाझर तलावांच्या कामांमध्ये अतिरिक्त देयके दिल्याच्या आरोपावरून दोन सेवानिवृत्त अभियंत्यांवर करण्यात आलेली दंडात्मक वसुली महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे (मॅट) न्या. व्ही.के. जाधव (उपाध्यक्ष) आणि प्रशासकीय सदस्य विनय कारगावकर यांच्या खंडपीठाने रद्द केली. अभियंत्यांकडून वसूल केलेली रक्कम तीन महिन्यांत परत करण्यासह वेतनवाढ, निवृत्तिवेतन आणि अन्य अनुषंगिक लाभ देण्याचे आदेश न्यायाधिकरणाने राज्य शासनाला दिले.

वैभव चव्हाणचा मृतदेह आढळला

खेळाडू असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणणार्‍या नवगण राजुरी येथील वैभव चव्हाण या युवकाचा मृतदेह आढळून आला. इमामपुर शिवारात हा मृतदेह आढळल्यानंतर नातेवाईकांनी घातपाताचा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

राजू शेट्टींचं आंदोलन स्थगित!

सदराच्या मागणीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनावर अखेर तोडगा निघाला आहे. तब्बल 61 तासांच्या चक्काजाम आंदोलनानंतर साखर कारखानदारांनी राजू शेट्टी यांची 4,200 रुपयांची मागणी मान्य केली. त्यानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल 3,900 रुपये, हंगाम संपल्यानंतर 100 रुपये आणि पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी 200 रुपये देण्याचे निश्चित झाले आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.