Beed BJP MLA : बीड जिल्ह्यातील भाजप आमदारांना 'मुख्यमंत्री ग्रामसडक' योजनेअंतर्गत 60 कोटींचा निधी!

Beed Road work : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांकडून मतदारसंघात जास्तीत जास्त निधी आणण्याचे प्रयत्न सुरू
Beed BJP MLA
Beed BJP MLASarkarnama

Beed News : बीड जिल्ह्यातील केज, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार आणि गेवराई मतदारसंघातील 23 रस्त्यांसाठी 59 कोटी 20लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा - दोन संशोधन विकास कार्यक्रमांतर्गत हा निधी मिळाला आहे. राज्याचे ग्रामविकास खाते भाजपचे गिरीश महाजन(Girish Mahajan) यांच्याकडे असल्याने भाजप आमदारांना निधीचे झुकते माप मिळाल्याचे दिसत आहे.

केज मतदारसंघात भाजपच्या नमिता मुंदडा प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या मतदारसंघात सर्वाधिक 27 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे, तर गेवराईत भाजपचे लक्ष्मण पवार यांनीही शिफारस केलेल्या कामांना निधी मिळाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Beed BJP MLA
Hingoli Loksabha Constituency : मोपलवारांची दुसरी इनिंग ? हिंगोलीमधून युतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता...

याशिवाय, लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या सुरेश धस(Suresh Dhas) यांनीही आष्टी/पाटोदा/शिरूर कासार मतदारसंघातील रस्त्यांसाठी हा निधी मिळविण्यात यश मिळविले आहे.

59 कोटी 20 लाख रुपयांच्या निधीतून 23 रस्त्यांची दर्जा सुधारण्याची कामे होणार आहे. निवडणुकीला एक वर्षाचा कालावधी राहिल्याने आता आमदारांकडून निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्यातील नवे राजकीय समीकरण व जिल्ह्याचे राजकीय समीकरण विरोधाभासाचे असल्याने भाजप नेते आपल्या पक्षाच्या मंत्र्यांकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

याशिवाय, राष्ट्रवादीकडे पालकमंत्री पदासह राज्याच्या आर्थिक तिजोरीचीही चावी असल्याने त्यांच्याकडूनही वेगवेगळ्या कामांसाठी निधी आणला जात आहे.

Beed BJP MLA
Marathwada BJP News : फडणवीसांकडून कराडांना `लिफ्ट`; संभाजीनगरातील विकासकामांना दिली गती...

'प्रधानमंत्री किसान योजना' सर्वेक्षणातही बीडचा ठसा -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी 'प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत’ संपूर्ण सर्वेक्षण मोहिमेत त्यांच्या गुजरातपेक्षा बीड जिल्हा भारी ठरल्याचं दिसून आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गुजरातपेक्षा बीड जिल्ह्याच्या तब्बल १३९ पट शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी पूर्ण झाली होती.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, पंजाब आदी राज्यांचा या मोहिमेत समावेश आहे. या योजनेत बीड जिल्ह्यातील तीन लाख ६९ हजार ९३३ शेतकऱ्यांच्या महसुली माहितीची पडताळणी पूर्ण झाली होती, तेव्हा गुजरात राज्याची ही स्थिती केवळ २६४७ होती. विशेष म्हणजे ऊसतोड मजुरांचे सर्वाधिक स्थलांतर होणारा हा जिल्हा असून, पंधरवड्यापासूनच मजुरांचे स्थलांतर होऊनही वेगाने काम करण्यात यंत्रणेला यश आल्याचे दिसून आले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com