Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama

Ambadas Danve : शासन येई दारी, विद्यार्थी बसे घरी ! दानवेंनी टीकेची संधी साधली..

Shivsena UBT : शासन आपल्या दारी कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी संगमनेर आगाराच्या ६३ बसेस पाठविण्यात आल्या होत्या.

Marathwada News : `शासन आपल्या दारी`, योजनेवर सुरुवातीपासून टीका करणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिर्डीतील कार्यक्रमावरुन सरकारवर टीका करण्याची संधी साधलीच. (Ambadas Danve News) परिवहन विभागाच्या एसटी बसेस शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी पाठवल्याच्या फलकाचा हवाला देत दानवे यांनी सरकारवर खरमरीत टीका केली.

Ambadas Danve News
Sharad Pawar Beed Sabha : पवारांकडून क्षीरसागरांचे कौतुक, मोदींवर निशाणा ; पण मुंडेंना सोडले..

दानवे यांनी ट्विट करत सरकार आपल्या दारी येत असल्याचा देखावा करून एखाद्या आगाराच्या सगळ्या बस अडकवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणे, हे कोणत्या तत्वात बसते (Shivsena) मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे ? (Eknath Shinde) अश्या फेऱ्या रद्द होणार होत्या तर शेजारील आगारातून अतिरिक्त बसची सोय का करण्यात आली नाही? का विद्यार्थी वेठीस धरता? हेच कित्ते इतर ठिकाणीही गिरवले जात आहेत, देवेंद्र फडणवीस, अजित पवार असा टोला देखील दानवे यांनी ट्विटच्या माध्यमातून लगावला आहे.

शिर्डी येथे आज झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी संगमनेर आगाराच्या ६३ बसेस पाठविण्यात आल्या होत्या. (Maharashtra) त्यामुळे ग्रामीण भागासह शालेय फेऱ्यादेखील रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातून तालुक्याला एसटीने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना घरीच बसावे लागले. संगमनेर आगाराच्या या फलकाचा दाखला देत दानवे यांनी पुन्हा सरकारवर टीका करण्याची संधी साधली.

नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातही दानवे यांनी शासन आपल्या दारी योजनेसाठी आमदारांना स्थानिक निधीमधून २० लाख रुपये देण्याचे आवाहन केले होते. यावर देखील दानवे यांनी टीका करत आधीच निधीचे असमान वाटप होत आहे. त्यात शासन आपल्या दारीसाठी निधी देण्याची सक्ती का? असा सवाल उपस्थितीत केला होता. हा कार्यक्रम म्हणजे केवळ दिखावा असल्याचा आरोपही दानवे यांनी केला होता.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com