Parbhani Politics : पाथरीतील साई मंदिरासाठी 90 कोटींचा आराखडा मंजूर; आता श्रेय लाटण्यासाठी राजकीय पक्षात चढाओढ !

Pathri : पाथरी येथील साईमंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी सरकारने 90 कोटींचा विकास आराखडा मंजूर केला.
Pathri Sai Baba
Pathri Sai BabaSarkarnama
Published on
Updated on

Parbhani News: 'श्रद्धा आणि सबुरी'चा संदेश देणारे साईबाबा यांची जन्मभूमी असलेले परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील साईमंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी शासनाने 90 कोटींचा विकास आराखडा मंजूर केला. पाथरी येथील साई जन्मभूमी मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी तयार केलेल्या या आराखड्यानंतर आता त्याचे श्रेय घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते मंडळी पुढे आले आहेत.

शिवसेनेच्या (शिंदे गट) अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क असल्यामुळे विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी चालना मिळाल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे, तर दुसरीकडे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनीही विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केलेले प्रश्न व त्यास मिळालेल्या उत्तराची सर्वांना आठवून करून दिली.

तर भाजपचे प्रदेश प्रवक्ते डॉ. उमेश देशमुख यांनी संस्थानच्या विश्वस्तांची भेट घेत विकास आराखडा मंजूर होण्यासाठी भाजपने केलेल्या प्रयत्नांची माहितीच दिली. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. पी. डी. पाटील यांनी पत्राद्वारे केलेल्या पाठपुराव्याकडे समाजमाध्यमांतून लक्ष वेधले.

Pathri Sai Baba
Sunil Shelke On Rohit Pawar : "...तेव्हा भाजपसोबत जाण्यास रोहित पवारच आग्रही होते! '' ; आमदार शेळकेंचा खळबळजनक दावा

विकास आराखड्यावरून नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप

साईबाबा मंदिर विकास आराखडा प्रलंबित असताना राजकीय नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व विधान परिषद सदस्य यांनी याबद्दल विधिमंडळात प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, परभणीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पाथरीचे माजी आमदार मोहन फड हे विकास आराखडा मंजूर होण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करत असल्याचा जाहीर आरोप केला होता.

"आमदार बाबाजानी दुर्राणी आमदार असूनही त्यांना विकास आराखडा मंजूर करता आला नव्हता. मात्र, विकास आराखडा मंजूर होताच त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत", असा आरोप शिवसेना नेते सईद खान यांनीही केला होता.

आराखड्यात नेमकं काय आहे ?

विकास आराखड्यात प्रामुख्याने मंदिर परिसर व मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादन केले जाणार आहे. भक्तांसाठी सभामंडप आणि अन्य आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. ही सर्व कामे नगर परिषद, पाथरी यांच्यामार्फत केली जाणार आहेत. पण त्यावर जिल्हास्तरीय समितीचे नियंत्रण असणार आहे.

कसा होणार फायदा ?

सद्यःस्थितीत साई मंदिर येथील परिसरात नागरिकांची निवासस्थाने आहेत. तसेच मंदिराकडे जाण्यासाठी अतिशय अरुंद रस्ते आहेत. विकास आराखडा प्रत्यक्षात आल्यावर अरुंद रस्त्यांचे विस्तारीकरण होणार असून, मंदिर परिसरात भूसंपादन केले जाणार आहे. यामुळे साईभक्तांची संख्या वाढून जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

Pathri Sai Baba
Rohit Pawar Mumbai Local : आमदार रोहित पवारांचा मुंबई ते कल्याण लोकल प्रवास; जाणून घेतल्या सर्वसामान्यांच्या अडचणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com