Beed News: मुख्याधिकारी डॉ. गुट्टेंना मोठा दिलासा; फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती

Dr.utkarsh gutte: 'स्टे' असतानाही आणि बदलीनंतर लेआऊट मंजूर केल्याप्रकरणी डॉ. गुट्टेंवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते.
Dr.utkarsh gutte
Dr.utkarsh gutteSarkarnama
Published on
Updated on

Beed News: अंबाजोगाई नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. डॉ.गुट्टे यांच्यावर न्यायालयाचा अवमान आणि शासनाचा विश्वासघात केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य शासनाचे अवर सचिव दत्तात्रय कदम यांनी चार ऑक्टोबरला दिले होते. मात्र, या आदेशाला आता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्थगिती दिल्यामुळे मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांना दिलासा मिळाला आहे.

न्यायालयाचा अवमान आणि सरकारचा विश्वासघात केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. या आदेशाला आठ दिवस होऊन गेले तरी देखील प्राधिकृत केलेल्या नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी फिर्याद दिली नव्हती. आता या आदेशाला खंडपीठाने स्थगिती दिली. या प्रकरणात तत्कालिन सहाय्यक नगर रचनाकार अशुतोष कावलकर व तत्कालिन सहाय्यक नगर रचनाकार अ.फै.अन्सारी यांचाही समावेश होता.

Dr.utkarsh gutte
Bharat Gogawale News : ...अखेर गोगावलेंचं मंत्रिपदाचं स्वप्नं पूर्ण होणार ? शिंदे गटातील नेत्याने दिले मोठे संकेत

ज्या प्रकरणात दिवाणी न्यायालयाने 'जैसे थे' आदेश दिले होते, त्याच प्रकरणात मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांनी तात्पुरत्या लेआऊट साठी मंजुरी देत विकास शुल्क भरून घेतले होते. महत्वाचं म्हणजे त्यांची बदली २७ मे २०२२ रोजी झाली होती. त्यांच्या जागी उमेश ढाकणे यांची नेमणूक शासनाने केली होती. तर ३० मे ला उमेश ढाकणे रुजू झाले व डॉ.गुट्टे कार्यमुक्त झाले होते.

पण याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ मे २०२२ ला डॉ.उत्कृष्ट गुट्टे यांनी गिराम तरफमधील १५ हजार ६५० चौरस मिटर क्षेत्राचे तात्पुरता (सिमांकनासाठीचा) अभिन्यास मंजूर केल्याचा ठपका चौकशी समितीने त्यांच्यावर ठेवला होता. यानुसार हे आदेश देण्यात आले होते.

या प्रकरणात नियमानुसारच काम केले असून या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी याचिका डॉ.गुट्टे यांनी खंडपीठात दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी न्यायालयात झाल्यानंतर न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस देण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी ३० नोव्हेंबरला ठेवली. तसेच तोपर्यंत गुन्हा दाखल करायला स्थगिती दिली आहे.

Edited by Ganesh Thombare

Dr.utkarsh gutte
Beed Municipal Council: गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती मिळवण्यासाठी मुख्याधिकारी डॉ. गुट्टेंची थेट मंत्रालयात फिल्डिंग ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com