Beed Municipal Council: गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती मिळवण्यासाठी मुख्याधिकारी डॉ. गुट्टेंची थेट मंत्रालयात फिल्डिंग ?

Dr.utkarsh gutte 'स्टे' असतानाही बदलीनंतर लेआऊट मंजूर; मुख्याधिकाऱ्याने केलेल्या कारनाम्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश
Beed Municipal Council
Beed Municipal CouncilSarkarnama
Published on
Updated on

Beed News: बीड नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असताना वादग्रस्त ठरलेले आणि सध्या अंबाजोगाई नगरपालिकेत कार्यरत असलेले मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांचे बीडमधील कारनामे चौकशीत समोर आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान आणि सरकारचा विश्वासघात केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

पण याला आठ दिवस होऊन गेले तरीदेखील प्राधिकृत केलेल्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फिर्याद द्यायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे आता राज्य सरकारच्या या आदेशाला स्थगिती आणण्यासाठी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनी थेट मंत्रालयात फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे.

Beed Municipal Council
Maharashtra politics : राजकारण फिरले ; ज्या फडणवीसांनी सत्तेत आणले त्यांनाच दिल्लीत पाठवण्याची शिंदे गटाला घाई

शासनाचे अवर सचिव दत्तात्रय कदम यांनी चार ऑक्टोबरला गुन्हा नोंद करण्याच्या आदेशाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना गुन्हा नोंद करण्यासाठी प्राधिकृत केले. मात्र, त्यांच्याकडून या प्रकरणात जाणीवपूर्वक वेळकाढूपणा होत आहे. या प्रकरणात तत्कालीन सहायक नगररचनाकार आशुतोष कावलकर व तत्कालीन सहायक नगररचनाकार अ. फै. अन्सारी यांचाही समावेश आहे.

बीड नगरपालिकेतील अनागोंदीप्रकरणी निलंबित झालेल्या मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांचा 'ले आऊट' प्रकरणाचा मोठा कारनामा समोर आला आहे. ज्या प्रकरणात न्यायालयाने 'जैसे थे' आदेश पारित केले, त्याच प्रकरणात उत्कर्ष गुट्टे यांनी तात्पुरत्या लेआऊटसाठी मंजुरी दिली तसेच विकास शुल्क भरून घेतले.

विशेष म्हणजे त्यांची बदली २७ मे २०२२ रोजी झाली. त्यांच्या जागी उमेश ढाकणे यांची नेमणूक करण्यात आली. ३० मे लाच उमेश ढाकणे रुजू झाले व डॉ. गुट्टे कार्यमुक्त झाले. मात्र, याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ मे २०२२ रोजी डॉ. उत्कृष्ट गुट्टे यांनी गिराम तरफमधील १५ हजार ६५० चौरस मीटर क्षेत्राचे तात्पुरता (सीमांकनासाठीचा) अभिन्यास मंजूर करण्याचा प्रताप केला.

यावरून येथील तत्कालीन मुख्याधिकारी व आता अंबाजोगाई नगर पालिकेला कार्यरत असलेले डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्यासह तत्कालीन नगररचनाकार अनवरोद्दीन फैज अन्सारी आणि तत्कालीन सहायक नगररचनाकार आशुतोष कावलकर यांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आणि सरकारचा विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश नगरविकास विभागाचे यावर सचिव दत्तात्रय कदम यांनी जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासाठी जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यांना प्राधिकृत केले. मात्र, आदेशाला नऊ दिवस लोटले तरी अद्याप याला मुहूर्त मिळाला नाही.

दरम्यान, डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्या विरोधात भाजपच्या संघटनेतील एका पदाधिकाऱ्याने शासनाकडे तक्रार दिली होती. नंतर फाॅलोअपमध्ये माशी शिंकली. उलट त्यांना पुन्हा अंबाजोगाईसारख्या क्रिम ठिकाणी पोस्टिंग मिळाली. आताही त्यांच्यावरील गुन्ह्याबाबतच्या आदेशाला स्थगिती मिळावी, यासाठी सत्तापक्षातीलच नेतेमंडळींनी मंत्रालयात फिल्डिंग लावल्याची माहिती खात्रिशीर सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Edited by Ganesh Thombare

Beed Municipal Council
Kolhapur Politics : शहराच्या हद्दवाढीवरून कोल्हापुरात राजकारण तापलं ? मतदारसंघ शाबूत ठेवण्यासाठी नेत्यांची धडपड

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com