MLA Santosh Bangar News : आमदार संतोष बांगर फसले, आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल

Santosh Bangar Charged : या विधानाचा व्हिडिओ सोशल मिडिया आणि चॅनलवर व्हायरल झाला होता. या गंभीर प्रकाराची दखल निवडणुक आयोगाने तातडीने घेत काल बांगर यांना चोवीस तासात खुलासा करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती.
MLA Santosh Bangar
MLA Santosh BangarSarkarnama
Published on
Updated on

Election Commission News : कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर अखेर `मतदारांना आणण्यासाठी फोन पे करा`, असे विधान केल्याप्रकरणी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. कळमनुरी या आपल्या मतदारसंघात आयोजित पक्षाच्या नियोजन बैठकीत संतोष बांगर यांनी उत्साहाच्या भरात `मतदारांना आणण्यासाठी वाटेल ते करा, गाड्या पाठवा, फोन पे, गुगल पे वरून काय करायचे ते करा`, असे आवाहन केले होते.

या विधानाचा व्हिडिओ सोशल मिडिया आणि चॅनलवर व्हायरल झाला होता. या गंभीर प्रकाराची दखल निवडणुक आयोगाने तातडीने घेत काल बांगर (Santosh Bangar) यांना चोवीस तासात खुलासा करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती.

पण व्हिडिओ आपला असला तरी तो एडिट करून प्रसारित करण्यात आला आहे. मला फोन पे, गुगल पे माहित नाही. विरोधकांनी हा व्हिडिओ एडीट करून व्हायरल केला आहे, असा दावा बांगर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देतांना केला होता.

हाच खुलासा आपण निवडणुक आयोगाने पाठवलेल्या नोटीसीवर करणार असल्याचे बांगर म्हणाले होते. त्याप्रमाणे बांगर यांनी आपला खुलासा निवडणुक आयोगाकडे केला. त्यानंतर आज बांगर यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांगर यांनी निवडणूक आयोगाकडे खुलासा केल्यानंतर त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ तपासण्यात आला.

MLA Santosh Bangar
Santosh Bangar : आमदार बांगर बोलतोय; ये गाडी सोडून दे...

त्यानंतर आज (ता. 20) निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेवरून गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. (Election Commission) त्या तक्रारीनुसार आमदार संतोष बांगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी राज्यातील हा पहिला गुन्हा शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर दाखल झाला आहे. यापूर्वी देखील संतोष बांगर यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com