High Court News : भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला, मंत्री संजय शिरसाट यांच्या निवडीला आव्हान!

"A challenge has been filed in the High Court against the election of Minister Sanjay Shirsat : निवडणूक काळात शिवसेनेला मतदान करण्यासाठी मतदारांना पैसे वाटप करण्यात आले. सातारा देवळाई भागात माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब हिवाळे हे मतदारांना पैसे वाटतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित झाला होता.
Raju Shinde -Sanjay Shirsat News
Raju Shinde -Sanjay Shirsat NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : औरंगाबाद पश्चिम विधानसभा (एससी राखीव) मतदार संघाचे निवडून आलेले शिवसेनेचे उमेदवार तथा मंत्री संजय शिरसाट यांनी मतदारांना मतदान करण्यासाठी आणि मुस्लिम मतदारांना मतदान न करण्यासाठी पैसे वाटले आहेत. शिरसाट यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करुन निवडणूक जिंकली. त्यामुळे त्यांची निवड रद्द करावी, अशी मागणी पराभूत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजू शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिका दाखल करत केली आहे.

प्राथमिक सुनावणीत न्यायमूर्ती के. सी. संत यांनी प्रतिवादी राज्य शासन, निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. औरंगाबाद पश्चिम विधानसभा (108) मतदार संघाच्या निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार मंत्री संजय शिरसाट यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याच्या विरोधात पराभूत उमेदवार राजू शिंदे यांनी ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्या मार्फत ही निवडणूक याचिका दाखल केली आहे.

निवडणूक काळात शिवसेनेला (Shivsena) मतदान करण्यासाठी मतदारांना पैसे वाटप करण्यात आले. सातारा देवळाई भागात माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब हिवाळे हे मतदारांना पैसे वाटतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित झाला होता. सदर व्हिडीओमध्ये हिवाळे हे मतदारांना प्रत्येकी पाचशे रुपयांचे वाटप करुन शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. हा व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या पथकाने दखल घेवून सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Raju Shinde -Sanjay Shirsat News
Sanjay Shirsat News : शिरसाट साहेब जरा सबुरीने घ्या! शिवसेना एकत्रि‍करणाच्या विधानाने मनं दुभंगली!

त्यानुसार संजय शिरसाट यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे. दुसऱ्या प्रकरणात शिवसेनेला फायदा व्हावा म्हणून मुस्लिम मतदारांना मतदान न करण्यासाठी काही लोक पैसे वाटत होते. या प्रकरणातही निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरुन संजय शिरसाट यांच्या विरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या शिवाय निवडणूकीच्या दिवशी वाळूज भागात विरोधी उमेदवार राजू शिंदे यांना मतदान होत असल्याने शिरसाट यांनी पोलिसांना सांगून लाठीचार्ज करण्यास सांगीतले, याची तक्रार शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Raju Shinde -Sanjay Shirsat News
High Court News : अब्दुल सत्तार यांना शिवीगाळ केल्या प्रकरणी भाजप शहराध्यक्षासह तिंघावर दाखल गुन्हा, दोषारोपपत्र रद्द!

संजय शिरसाट यांनी मतदानासाठी धमकावल्याचा व्हिडीओ, पैसे वाटप करतानाचे व्हिडीओ, पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आलेले आहेत. रिप्रेझेंटेंशन ऑफ पीपल्स ॲक्ट कलम 125 अन्वये संजय शिरसाट हे मतदारांना पैसे वाटप करुन, भ्रष्ट मार्गाचा अवलंब करुन निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्याची मागणी शिंदे यांनी ॲड सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत दाखल याचिकेत केली आहे. याचिकेची पुढील सुनावणी 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com