
Chhatrapati Sambhajinagar : माजीमंत्री तथा सिल्लोड चे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांना शिवीगाळ केल्या प्रकरणी भाजपाच्या शहराध्यक्षासह इतर दोघांविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा आणि दोषारोपपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. विभा कंकणवाडी, न्या. संजय देशमुख यांनी रद्द केले.
अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली सिल्लोड भाजपचे शहराध्यक्ष कमलेश गोविंदराम कटारिया, सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरलाल शंकरपेल्ली,अमोल अशोक ढाकरे या तिघांवर गुन्हा दाखल करून दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते. सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती तथा छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष अर्जुन गाढे यांनी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात तक्रार फेब्रुवारी 2021 मध्ये वरील तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
भाजपा (BJP) शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांचा सिल्लोड शहरात सर्वे क्रमांक 39/3 मध्ये भुखंड आहे. या जागेवर कटारियांकडून संरक्षित भिंत बांधण्याचे काम सुरू होते. नगर परिषद प्रशासनाने कटारिया यांना कोणतीही नोटीस न देता अचानक त्यांचे बांधकाम तोडले. या कारवाईच्या विरोधात तालुका भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात 12 फेब्रुवारी 2021 रोजी सिल्लोड शहरात निषेध मोर्चा काढून चक्काजाम आंदोलन केले होते.
तर सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली यांनी समाजमाध्यमावर आंदोलनाच्या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल केले होते. मोर्चामध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांना शिवीगाळ करून त्यांचा अपमान करण्यात आला असून, त्यामुळे कार्यकर्ते व समर्थक यांच्या भावना दुखावल्याची तक्रार अर्जुन गाढे यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
त्यावरून भाजपा शहराध्यक्ष कमलेश कटारिया, महेश शंकरपेल्ली, अमोल ढाकरे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपांवरील पुरावे न देणे आणि तक्रारदाराचा संबंधित प्रकरणाचा कसलाही संबंध नसल्याचे मुद्दे खंडपीठात उपस्थित करण्यात आले. त्यावरून खंडपीठाने वरीलप्रमाणे गुन्हा व दोषारोपपत्र रद्द केले. आरोपींच्या वतीने ॲड. अंगद एल. कानडे यांनी बाजू मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.