Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सुनील कावळेंच्या मुलाला बाजार समितीत नोकरी

MLA Haribhau Bagde News : नियुक्तीपत्र सुनील कावळे यांच्या पत्नी अंजनाताई कावळे व मुलगा नागेश कावळे यांना देण्यात आले.
Marathwada Political News
Marathwada Political News Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Latest News : मराठा आरक्षणासाठी मुंबईत बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील सुनील कावळे यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे येत आहेत. (Marathwada News) भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांचे वर्चस्व असलेल्या छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुनील कावळे यांचा मुलगा नागेश कावळे याला कनिष्ठ लिपिक पदावर (हंगामी) नियुक्ती देण्यात आली आहे.

Marathwada Political News
CM Shinde On Maratha Reservation: आरक्षणासाठी मराठा समाजातील तरूण उचलतायत टोकाचं पाऊल; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ''माझ्या भावांनो..."

या नियुक्तीचे पत्र आमदार बागडे यांनी स्वतः कावळे यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांना दिले. दोन दिवसांपूर्वीच सुनील कावळे यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यापासून संतप्त मराठा तरुणांनी हरिभाऊ बागडे यांना रोखले होते. स्मशानभूमी बाहेर जमलेल्या तरुणांनी बागडे (Haribhau Bagde) यांच्याविरोधात घोषणाबाजी करत त्यांना पिटाळून लावले होते.

परंतु समाजाच्या भावना समजून घेत बागडे यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कावळे कुटुंबीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला. (Maratha Reservation) मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा सेवक सुनील कावळे यांच्या घरी आमदार हरिभाऊ बागडे यांनी भेट देत, त्यांच्या परिवाराला वैयक्तिक एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. (Marathwada) या मदतीचा धानदेश त्यांनी अंजना सुनील कावळे यांच्या स्वाधीन केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, कावळे यांच्या अंत्यविधीवेळी बागडे यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल उपस्थितांनी खेद व्यक्त केला. सार्वजनिक जीवनात वैयक्तिक व राजकीय राग काढण्यासाठी काही मंडळी अशा संधीची वाट बघत टपून बसलेली असतात, त्यामुळे त्याचं वाईट वाटून घेण्याचं कारण नसल्याचेही बागडे यांनी सांगितले.

दरम्यान, अंतरवाली सराटी येथे काल मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा जीआर निघेपर्यंत कुठल्याही कायद्याच्या पदावर बसलेल्या मंत्री, आमदार, खासदारांना गावात न येऊ देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी म्हणून बागडे यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबाला दिलासा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com