BJP Politics : पक्की खबर! शिवसेना ठाकरेंचे सहा खासदार भाजप फोडणार

ShivSena Uddhav Balasaheb Thackeray party MP join BJP : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे सहा खासदार फोडण्याची तयारी भाजपकडून सुरू आहे.
ShivSena and bjp
ShivSena and bjpSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईतून 'ऑपरेशन टायगर' सुरू केले आहे. यात भाजप शांत बसले, असे होणार नाही. भाजपने राज्यात राजकीय भूकंप घडवून आणण्याची तयारीत सुरू केली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे पाच खासदार भाजपच्या संपर्कात आहे. परंतु आणखी एक खासदार बरोबर घेऊन, सहा जणांचा स्वतंत्र गट तयार करून भाजपमध्ये घेण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.

शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नऊ खासदार आहेत. नऊपैकी सहा खासदार भाजपच्या गळाला लागू शकतात. त्यातील पाच जणांची तयारी झाली असून, ते भाजपच्या संपर्कात आहेत. परंतु पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी सहा जणांची आवश्यकता आहे. त्यामुळे हा प्रवेश थांबला आहे. स्वतंत्र गटच तयार करून, भाजपमध्ये जाण्याची तयारी असल्याचे सांगितले जाते. पण पाच खासदार कोण? आणि सहावा कोण असेल? याची चर्चा आता राज्याच्या राजकारणात आहे.

ShivSena and bjp
Bhagwant Mann: दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या घरावर छापा; काय आहे कारण

शिवसेना ठाकरे पक्षाच्या पाच खासदारांच्या भाजपबरोबर (BJP) गाठीभेटी सुरू आहेत. काही प्राथमिक बोलणी देखील झाली आहे. यात ज्या काही अडचणी आहेत, त्यावर देखील चर्चा झाली आहे. याशिवाय सर्व कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत. तशा चर्चा आता जरी सुरू असल्या, तरी हा भूकंप कधी घडवून आणायचा, याचा 'अंतिम फैसला' भाजप घेईल, असे देखील सांगितले जात आहे.

ShivSena and bjp
Top Ten News : रवींद्र धंगेकर मोठा निर्णय घेणार?; अजितदादांच्या समोरच बजरंग सोनवणे धनंजय मुंडे भिडले! - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सध्या राज्यात जोरदार इनकमिंग सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षातील आजी-माजी आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते वेगाने प्रवेश करत आहे. परंतु विरोधकांचे खासदार आपल्याच पक्षात यावे, यासाठी भाजपचा विशेष प्रयत्न आहे. त्यामुळे भाजप या फोडाफोडीसाठी राज्यात कोणते राजकारण खेळते, हे पाहाण्यासारखे ठरणार आहे.

भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सध्या युतीचे वारे वाहत आहे. तशा चर्चा आहेत. या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, हे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निडवणुकीच्या वेळी समजले. परंतु उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेची जोरदार तयारी केली आहे. राज्यातील इतर महापालिकेपेक्षा मुंबई महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा कसा फडकेल, यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सध्या शाखा बैठकांवर भर देत आहेत. यातच भाजपने सहा खासदार फोडले, तर तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com