Sanjay Shirsat : पालकमंत्री संजय शिरसाट पहिल्याच डीपीडीसीत अब्दुल सत्तारांना दणका देणार!

Sanjay Shirsat vs Abdul Sattar : विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत सत्तार यांनी जिल्हा नियोजन समितीतील निधीतून सर्वाधिक निधी आपल्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात नेला.
Sanjay Shirsat-Abdul Sattar
Sanjay Shirsat-Abdul Sattar Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी 26 जानेवारी रोजी शासकीय ध्वजारोहण केले आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पहिली बैठक घेतली. जिल्हा नियोजन समितीमध्ये मागच्या पालकमंत्र्यांनी मंजुर केलेली कामे, वाटप झालेला निधी, निघालेल्या वर्क आॅर्डर या सगळ्यांचा आढावा घेतला.

660 कोटींचा निधी डीपीडीसीला मिळाला होता, त्यातील 90 टक्के निधीचे नियोजन माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले होते. त्यांनी मंजूर केलेल्या दीडशे कोटींच्या कामावर नवनिर्वाचित पालकमंत्री संजय शिरसाट फुली मारण्याची शक्यता आहे.

जेमतेम दीडशे कोटी खर्च करण्याचे अधिकार पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना असणार आहे. मार्च पर्यंत हा निधी खर्च करावा लागणार असल्याने आता अब्दुल सत्तार यांनी मंजूर केलेली कोणती कामे शिरसाट बदलतात? त्यावर अब्दुल सत्तार काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत संदीपान भुमरे निवडून आल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्याकडे चार महिन्यांसाठी पालकमंत्री पद आले होते. विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत सत्तार यांनी जिल्हा नियोजन समितीतील निधीतून सर्वाधिक निधी आपल्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात नेला.

सिल्लोडमध्ये तब्बल 51 कोटींचा निधी सत्तार यांनी आपल्या अधिकारात दिला होता. विशेष म्हणजे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी वाटप केलेल्या 508 कोटींच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे. त्यामुळे ही कामे संजय शिरसाट यांना बदलता येणार नाहीत हे स्पष्ट आहे. संजय शिरसाट यांनी पालकमंत्री होण्याआधीच अब्दुल सत्तार यांनी निधी वाटपात भेदभाव केल्याचे सांगत त्यांनी मंजूर केलेल्या कामांचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले होते.

Sanjay Shirsat-Abdul Sattar
Abdul Sattar News : पालकमंत्री शिरसाट यांचे आव्हान अन् किरीट सोमय्या यांचा सिल्लोड मध्ये हस्तक्षेप; तरी अब्दुल सत्तार गप्प का!

आता येत्या 30 जानेवारी रोजी होणाऱ्या पहिल्या डीपीडीसी बैठकीत पालकमंत्री संजय शिरसाट काय निर्णय घेतात? कोणती कामे बदलतात? सत्तार यांच्या सिल्लोड नगरपरिषदेला देण्यात आलेल्या 51 कोटींच्या परंतु अद्याप काही कारणांमुळे प्रत्यक्षात सुरू न झालेल्या कामांबाबत काय भूमिका घेतात हे महत्वाचे ठरणार आहे.

माजी मंत्री अब्दुल सत्तार या बैठकीला हजर राहणार की मग दांडी मारणार? यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखालील पहिली बैठक वादळी ठरणार की शांतते पार पडणार? हे ठरेल.

Sanjay Shirsat-Abdul Sattar
Sanjay Shirsat : भुमरे घटनाबाह्य पालकमंत्री होते, शिरसाट अन् मी एकाच पक्षात काम केले; खैरेंची पालकमंत्री शिरसाट यांच्याशी हातमिळवणी!

संघर्ष अटळ

अब्दुल सत्तार हे डीपीडीसीच्या बैठकीला हजर राहिले तर पालकमंत्री संजय शिरसाट आणि सत्तार यांच्यात संघर्ष अटळ असल्याचे बोलले जाते. एकाच पक्षात असले तरी या दोन नेत्यांमधून सध्या विस्तव देखील जात नाही.

संजय शिरसाट मंत्री झाल्यानंतर त्यांनी सत्तार यांना टार्गेट केले होते. सिल्लोडमधून दादागिरी संपवणार, असा इशारा त्यांनी दिला होता. तर सिल्लोडमध्ये येणे इतके सोपे आहे का? मीच संभाजीनगरात येऊन तुमची दादागिरी संपवतो, अशा शब्दात सत्तार यांनी शिरसाट यांना आव्हान दिले होते.

Sanjay Shirsat-Abdul Sattar
Shivsena News : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर; तानाजी सावंत एकाकी

अब्दुल सत्तार पालकमंत्री असतांना जिल्ह्याचे संपूर्ण प्रशासन त्यांच्या दबावात काम करत होते, असा आरोप केला जातो. संजय शिरसाट यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पहिल्या बैठकीत दबावाखाली काम करू नका, मंत्री असो की लोकप्रतिनिधी जे योग्य आहे तेच करा, अशा सूचना संजय शिरसाट यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर 30 जानेवारी रोजी होणार्‍या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com