Eknath Shinde Help Shivsainik : ...आणि बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकाच्या मदतीला मुख्यमंत्री शिंदे धावले!

Shivsainik Arun Kamatkar News : बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक अरुण कामतकर मणक्याच्या समस्येमुळे दोन वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहेत.
Eknath Shinde News
Eknath Shinde News Sarkarnama

Solapur : शिवसेनेतील उभ्या फुटीला जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे. दोन्ही बाजूने आमचीच शिवसेना खरी असा दावा केला जात आहे. मात्र, अद्यापही सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये कुणाच्या बाजूनं उभं राहावं याविषयी संभ्रमाचं वातावरण आहे. याचदरम्यान,बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक व सोलापुरातील एसटी कामगार सेनेचे विभागीय सचिव अरुण कामतकर मणक्याच्या समस्येमुळे दोन वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहेत.

काही दिवसांपूर्वी त्यांनी मी एसटी कामगार सेनेचा विभागीय सचिव म्हणून 5 वर्षे काम केले. मात्र, आता मी अडचणीत आहे. अडचणीच्या काळात या शिवसैनिकाला मदत करा असं आवाहन केलं होतं. या शिवसैनिकाच्या मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावले आहे.

Eknath Shinde News
Ajit Pawar : महापुरुषांचे पुतळे का हटवले ; अजितदादांचा शिंदे सरकारला सवाल

सोलापुरातील एसटी कामगार सेनेचे माजी सचिव अरुण कामतकर मणक्याच्या समस्येमुळे अनेक दिवसांपासून अंथरुणाला खिळून पडले होते. शिवसेनेत उभी फूट पडल्यानं मदत उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray)कडे मागायची की एकनाथ शिंदेकडे हा मोठा प्रश्न पडला होता. माध्यमांशी संपर्क साधत अरुण कामतकर यांनी ठाकरे व शिंदे यांच्याकडे मदतीसाठी आर्त हाक दिली होती.

सोलापुरातील एसटी कामगार सेनेचे विभागीय सचिव अरुण कामतकर(Arun Kamatkar) मणक्याच्या समस्येमुळे दोन वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मी एसटी कामगार सेनेचा विभागीय सचिव म्हणून 5 वर्षे काम केले. मात्र, आता मी अडचणीत आहे. अडचणीच्या काळात या शिवसैनिकाला मदत करा असं आवाहन केलं होतं.

Eknath Shinde News
Gadchiroli District BJP : भाजपचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष बदलणार, इच्छुकांची स्थिती म्हणजे ‘मन मे लड्डू फुटा’

या आवाहनानंतर शिंदे गटाच्या पदाधिकारी यांनी कामतकर यांच्या मदतीसाठी जोरदार हालचाली सुरु केल्या. शिंदे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कामतकर यांच्या घरी पाठवत चौकशी केली. त्यांनी आजारी असलेल्या अरुण कामतकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी फोनवरुन संपर्क साधत त्यांचा संवाद घडवून आणला.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी अरुण कामतकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी कोणतीही काळजी करू नका आम्ही सर्व मदत करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी त्यांनी औषधोपचारांच्या खर्चासह रोख 1 लाखाची मदत दिली आहे. संकटकाळात मिळालेल्या मदतीनंतर बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकाला अश्रू अनावर झाले. कामतकर यांची शिवसेनेकडे औषधोपचाराच्या मदतीसाठी आर्त हाक दिली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाचे व सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अमोल शिंदे यांनी प्रतिसाद देत अरुण कामतकर यांची भेट घेतली. हाडाच्या शिवसैनिकाला आर्थिक मदत करत मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून दिला होता.

Eknath Shinde News
Ganesh Sugar Factory : ...तर भागीदारी तत्वावर विखे पाटलांना कारखाना चालवायला कसा दिला ?

ठाकरे गटाचीही मदत...

अरुण कामतकर यांच्या विनंतीनंतर ठाकरे गटा(Thackeray Group)ने घरी जात त्यांची चौकशी करत त्यांना मदतीचा हात पुढे केला. शिवसैनिक अरुण कामतकर यांच्या घरी ठाकरे गटाकडून डॉक्टर गेले. त्यांची घरातच तपासणी केली. त्यांना आयुर्वेदिक उपचारासाठी घेऊन जाणार आहे. ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी शिवसैनिकां(Shivsainik)ना अरुण कामतकर यांच्या घरी पाठवले. कामतकर यांच्यावर सोलापुरातील आयुर्वेदाचार्य डॉ. शिवरत्न शेटे यांच्याकडे उपचार करण्यात येणार आहे.

आपले सर्व पैसे परत देईन...

अरुण कामतकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला आर्थिक मदत न देता केवळ औषधोपचाराचा खर्च द्यावा अशी मागणी कामतकर यांनी केली होती. मी बरा झाल्यानंतर काम करून आपले सर्व पैसे परत देईन. त्यामुळे आता मला माझ्या पायावर उभे करा. मी आपल्याकडे भीक मागत नसून मदत मागत आहे असं आवाहन कामतकर यांनी केलं होतं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com