Abdul Sattar News : सत्तार आता तरी `संभाजीनगर` म्हणणार का ?

Shivsena : उद्धव ठाकरेंनी मला औरंगाबाद म्हणण्याची परवानगी दिली आहे, असे म्हणत संभाजीनगरचा उल्लेख टाळायचे.
Minister Abdul Sattar News
Minister Abdul Sattar NewsSarkarnama

Marathwada : औरंगाबादचे `छत्रपती संभाजीनगर` आणि उस्मानाबादचे `धाराशीव`, असे नामाकरण करण्यास अखेर केंद्राने मंजुरी दिली आहे. आता या नामांतराचे श्रेय कोणाचे यावरुन शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई सुरू झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शहरी भागात फायदा व्हावा यासाठी केंद्राने (Aurangabad) औरंगाबाद शहराचे नाव फक्त बदलले, जिल्हा मात्र औरंगाबादच असणार आहे.

Minister Abdul Sattar News
Politics : महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार?; केजरीवालांनी दिले स्पष्ट संकेत

यावरून आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. या नामांतराच्या निमित्ताने राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे आता तरी `संभाजीनगर`, म्हणणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपुर्वी अब्दुल सत्तार शिवसेनेत दाखल झाले होते. मे १९९८ मध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम औरंगाबादला विरोध करत या शहराचे नाव संभाजीनगर केले होते.

तेव्हापासून शिवसेना या शहराचा उल्लेख संभाजीनगर असाच करत आली आहे. सत्तार जेव्हा शिवसेनेत दाखल झाले तेव्हा ते शहराचा उल्लेख संभाजीनगर करणार का? असा प्रश्न त्यांना व त्याकाळातील शिवसेनेती नेत्यांना देखील विचारला जायचा. तेव्हा सत्तार यांच्याकडून मला उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद म्हणण्याची परवानगी दिली आहे, असे म्हणत संभाजीनगरचा उल्लेख टाळायचे.

शिंदे यांच्या बंडानंतर सत्तार त्यांच्यासोबत गेले. नव्या सरकारमध्ये सुद्धा सत्तार यांनी संभाजीगर म्हणण्याचे सातत्याने टाळले. पक्षाती वरिष्ठ नेत्यांनीही त्यांना कधी याबाबत फारसा आग्रह केल्याचे पहायला मिळाले नाही. परंतु तेव्हा शहराचे नामांतर अधिकृत झाले नव्हते. आता मात्र राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे शहराचे नाव अधिकृतपणे `छत्रपती संभाजीनगर`असे झाले आहे. त्यामुळे सत्तार आता तरी संभाजीनगर म्हणणार का? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.

सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातून सत्तार गेली तीन टर्म आमदार आहेत. जयभीम, जय महाराष्ट्र, रामराम, सलाम, दुवा, खुदाहाफीज, असे म्हणत सत्तार सर्व जाती-धर्मांच्या लोकांचा मान राखतात. पण इतकी वर्ष हिंदुत्ववादी पक्षांसोबत राहून देखील त्यांनी संभाजीनगरचा उल्लेख टाळत आपल्या समाज बांधवांचे मन राखले होते. आता सरकारनेच ` छत्रपती संभाजीनगर` नावावर मोहर उठवल्यामुळे सत्तार देखील ते मनापासून स्वीकारतात का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com