Abdul Sattar : अब्दुल सत्तारांचा पक्का डाव! आधी नवा गट केला, आता तिथूनच दुसऱ्या मुलांचे राजकीय लाॅचिंग

Sillod politics ZP News : शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी नव्याने तयार केलेल्या अंभई गटातून आपल्या दुसऱ्या मुलाचे राजकीय लॉंचिंग करत जिल्हा परिषद निवडणुकीत कुटुंबीय वर्चस्व अधिक मजबूत करण्याचा डाव आखला आहे.
Abdul Sattar
Abdul SattarSarkarnama
Published on
Updated on

Sillod Shivsena News : माझ्या नावातच 'सत्ता'आहे, असं छातीठोकपणे सांगणारे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचा राजकारणातील डाव हा पक्काच असतो याचा अनुभव पुन्हा आला आहे. जिल्हा परिषदेतील एक गट आपल्या विधानसभा मतदारसंघात निर्माण करत आता त्याच गटातून अब्दुल सत्तार यांनी आपल्या दुसऱ्या मुलाच्या राजकीय लाॅचिंगची तयारी सुरू केली आहे.

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी आपला मोठा मुलगा समीर सत्तार याला नगराध्यक्ष केले. आता थोरल्या आमेर सत्तार यांना अभंई गटातून जिल्हा परिषदेच्या आखाड्यात उतरवले आहे. त्यामुळे 'यासाठीच केला होता अट्टाहास' ही म्हण सत्तार यांना तंतोतंत लागू होते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत स्वबळावर लढत अब्दुल सत्तार यांनी पाचव्यांदा सिल्लोड नगपालिका एकहाती जिंकली. स्वतः अब्दुल सत्तार, त्यांच्या पत्नी, मुलगा यांनीच सर्वाधिक काळ नगराध्यक्ष म्हणून या नगरपालिकेवर वर्चस्व राखले. आता पुन्हा दुसऱ्यांदा समीर अब्दुल सत्तार याला नगराध्यक्ष करत त्यांनी सुत्रं आपल्याच हाती ठेवली आहेत. मतदारसंघातील बहुतांश संस्था, बाजार समिती, सोसायट्या, नगरपंचायती सत्तार यांच्याच ताब्यात आहेत.

Abdul Sattar
Mayor reservation : महापौरपदाची सोडत जाहीर; SC, ST, OBC साठी कोणत्या महापालिकेत आरक्षण? वाचा संपूर्ण यादी...

यानंतर सत्तार यांनी आता जिल्हा परिषदेकडे आपला मोर्चा वळवला आहे. जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजपची युती झाली. पण सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांनी युतीचा प्रस्ताव नाकारत स्वबळावर लढण्याची घोषणा केली. केवळ सिल्लोडच नाही तर कन्नड, फुलंब्रीसह इतर मतदारसंघातही अब्दुल सत्तार हस्तक्षेप करण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय सत्तार यांनी आपला थोरला मुलगा आमेर याला सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील नव्याने तयार करण्यात आलेल्या अंभई गटातून उमेदवारी दिली आहे.

Abdul Sattar
Abdul Sattar : माझ्या मतदारसंघाचं मी बघणार! सत्तारांचा तोराच वेगळा; शिवसेनेच्या आणखी एका आमदाराची साथ मिळणार?

सत्तार यांनी टाकलेला डाव हा जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेत महत्वाचा ठरू शकतो. स्वबळावर मतदारसंघातील अकराच्या अकरा गटात विरोधकांना धुळ चारत जिल्हा परिषदेच्या सत्तेत सत्तार यांना किंगमेकरची भूमिका वठवायची आहे. अशावेळी सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या अध्यक्षपदावर मुलाची वर्णी लावण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करू शकतात. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या सत्तेत अब्दुल सत्तार यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com