

Shivsena UBT News : अब्दुल सत्तार हा हुशार माणूस आहे. दोन शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत हे त्यांनी केलेले वक्तव्य, अंबादास दानवे आणि त्यांची झालेली गळाभेट हा काही योगायोग नव्हता, ती ठरवून घेतली होती, अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सत्तार-दानवे यांना सुनावले. दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतली, तो अधिकार अंबादास दानवेंना नाही. हवे तर दोघांनी मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घ्यावी, उगाच लोकांमध्ये संभ्रम का निर्माण करता? असा सवालही खैरे यांनी केला.
विधान परिषद निवडणुकीच्या धामधुमीत अब्दुल सत्तार यांनी महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध मुलाचा अपक्ष अर्ज दाखल करत बंडाचे निशाण फडकावले. दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांची गळाभेट घेत तुमच्या प्रमाणेच माझीही दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत अशी इच्छा असल्याचे सांगीतले. यावरून महायुतीत तणाव आणि विरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. या सगळ्या घडामोडींवर ठाकरेंचे दुसरे नेते चंद्रकांत खैरे यांनी सडेतोड भूमिका घेत सत्तार-दानवे यांना फटकारले.
अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलेली खदखद त्यांच्या पातळीवर बरोबर असेल. आम्ही मात्र त्यांची गमंत पाहत आहोत, चालू द्या, तुमची भांडण होऊ द्या. काल ठाण्यात झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांना दम दिला. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत त्यांच्या मुलाने भरलेला अपक्ष अर्ज ते मागे घेतील. एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापनेच्या वेळी आमच्या मंत्र्यांचा कालावधी हा अडीच वर्षांचा असेल. त्यानंतर दुसऱ्यांना संधी दिली जाईल, असे जाहीर केले होते.
सत्तार यांनी मुलाला करायला लावलेले बंड आणि भाजपावर टीका करत दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत हे केलेले विधान त्याचीच तयारी आहे, पुढे अडीच वर्षे मंत्रीपद द्या, अशी अप्रत्यक्ष मागणी आणि ते पदारात पाडून घेण्यासाठी आखलेला सत्तार यांचा हा प्लॅन असल्याचा दावा, चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. टायमिंग साधून हे सगळं चाललं आहे, सत्तार खूप हुशार माणूस आहे. कधी इकडे, कधी तिकडे, कधी आमच्या शिवसेनेत आले होते. कधी काँग्रेसमध्ये, कधी भाजपात चालले होते, असा टोलाही त्यांनी सत्तार यांना लगावला.
सत्तार-दानवे ठरवून भेटले..
अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांनी एकमेकांची गळाभेट घेतली होती. या दोघांना दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असं वाटत आहे. यावर या दोघांना वाटून काही फायदा नाही, निर्णय घेणारे उद्धव ठाकरे आहेत. तुम्हाला बोलायचं असेल तर उद्धव ठाकरेंकडे जा. उगाच कशाला लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. काही निर्णय घ्यायचा असेल तर आपापल्या नेत्यांना जाऊन बोला त्यांना सांगा, असा चिमटा खैरे यांनी सत्तार-दानवेंना काढला.
सत्तार-दानवे यांनी गळाभेट घेणे बरोबर नाही, आपले मतदार आहेत ते काय म्हणतील? सत्तार तिकडून येत होते, अंबादास दानवे थांबले होते, त्यांची वाट पाहत आणि त्याच्यानंतर हे झालं. तो तिकडून आला हे इकडून आला असे झाले नाही, ही ठरवून घेतलेली भेट होती, यावर उद्धव ठाकरेच बोलतील, असेही खैरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.