Abdul Sattar V/S Raosaheb Danve : अब्दुल सत्तार म्हणतात, रावसाहेब दानवेंनी माझी तक्रार शिंदे-फडणवीसांकडे करावी, तिथेच सोक्षमोक्ष लावू!

Abdul Sattar expressed that Raosaheb Danve should forward his complaint to Shinde and Fadnavis. : सत्तार यांनी मतदानाआधी आपण एक लाख मतांनी निवडून येऊ असा दावा केला होता. परंतु रावसाहेब दानवे यांच्या खेळीने सत्तार यांचे मनसुबे उधळले गेले. महाविकास आघाडीकडून लढलेल्या सुरेश बनकर यांचा विजय थोडक्यात हुकला.
Abdul Sattar-Raosaheb Danve Controversy News
Abdul Sattar-Raosaheb Danve Controversy NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena-BJP Politics : राजकारणात काही गोष्टी घडत असतात, पण त्या कोणी एक व्यक्ती घडवू शकत नाही. त्यामुळे वादविवाद आणि आरोप-प्रत्यारोप करून काही साध्य होणार नाही. त्यापेक्षा रावसाहेब दानवे यांनी माझी देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करावी. तिथे याबाबत चर्चा होऊ शकते, असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना केले आहे.

लोकसभेच्या जालना मतदारसंघात महायुतीचे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा पराभव झाला. अब्दुल सत्तार शिवसेनेचे आमदार असताना त्यांनी युतीधर्म न पाळता काँग्रेसच्या कल्याण काळे यांचे काम केले होते. याची जाहीर कबुलीही सत्तार यांनी अनेकदा दिली होती. विरोधात काम केल्यामुळे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात सत्तार यांना मोठी किमंत चुकवावी लागली. अवघ्या 2420 मतांनी ते निवडून आले.

सत्तार यांनी मतदानाआधी आपण एक लाख मतांनी निवडून येऊ असा दावा केला होता. परंतु रावसाहेब दानवे यांच्या खेळीने सत्तार यांचे मनसुबे उधळले गेले. महाविकास आघाडीकडून लढलेल्या सुरेश बनकर यांचा विजय थोडक्यात हुकला. (Abdul Sattar) अब्दुल सत्तार विजयी झाले, पण त्यांना मताधिक्य घटल्याचा मोठा धक्का बसला.

Abdul Sattar-Raosaheb Danve Controversy News
Abdul Sattar News : निवडणूक संपली आता सोडून द्या; अब्दुल सत्तार यांची रावसाहेब दानवेंना पुन्हा साद!

शिवाय निवडणुकीतील पराभवानंतर सुरेश बनकर यांची भाजपमध्ये घरवापसी करत दानवे यांनी नगरपरिषद निवडणुकीत सत्तार यांना घेरण्याची तयारी सुरू केली. या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी निवडणुक संपली आता सोडून द्या, असे आवाहन करत रावसाहेब दानवे यांच्यापुढे पुन्हा मैत्राचा हात केला. दानवे यांनी अद्याप सत्तार यांच्या कुठल्याच विधानावर भाष्य केले नाही.

Abdul Sattar-Raosaheb Danve Controversy News
Abdul Sattar V/s Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांनी दहा वर्ष पालकमंत्री राहावं, मला काही फरक पडत नाही!

सत्तार यांनी मात्र दानवे आणि त्यांच्यात जालना लोकसभा मतदारसंघातील पराभवानंतर आलेले वितुष्ट दूर करण्याच्या प्रयत्नात आहे. अगदी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपली बाजू मांडण्याची तयारी सत्तार यांनी दर्शवली आहे. आम्ही दोघे एकमेकांचे दाजी आहोत, पण दानवे सध्या माझ्यावर नाराज आहेत, असेही सत्तार म्हणतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com