Abdul Sattar V/s Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांनी दहा वर्ष पालकमंत्री राहावं, मला काही फरक पडत नाही!

Guardian Minister Sanjay Shirsat responds to MLA Abdul Sattar's statement. : मुळात शिरसाट यांनी कुठलाही असा चुकीचा किंवा वाईट निर्णय घेतलेला नाही, ज्यामुळे आमच्यात कटूता निर्माण होईल. काही लोक माझ्याविरोधात षडयंत्र रचत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे.
Abdul Sattar-Sanjay Shirsat News
Abdul Sattar-Sanjay Shirsat NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : 'मी कसा गेम केला? ज्यांचा केला त्यांना समजला' अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माजीमंत्री अब्दुल सत्तार यांना डिवचले होते. आता पाच वर्ष मीच पालकमंत्री राहणार असे सांगत सत्तार यांच्या अडीच वर्षांनी मी पुन्हा येईन, या दाव्यातील हवाही काढली होती. शिरसाट मंत्री झाल्यापासून त्यांनी सत्तार यांना डिवचण्याची एकही संधी सोडली नव्हती. आता सत्तार यांच्याकडूनही शिरसाट यांच्यावर पलटवार केला जात आहे.

मला कोणी साधा खिलाडी समजू नका, मला कोणी एकटं पाडू शकत नाही. (Sanjay Shirsat) शिरसाट यांनी पाच काय दहा वर्ष पालकमंत्री रहावं. मला त्याचा काहीही फरक पडत नाही. मुळात शिरसाट यांनी कुठलाही असा चुकीचा किंवा वाईट निर्णय घेतलेला नाही, ज्यामुळे आमच्यात कटूता निर्माण होईल. काही लोक माझ्याविरोधात षडयंत्र रचत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. मला एकट पाडण्याचा प्रयत्न केला जात असेल पण मी त्यांची चिंता करत नाही, अशा शब्दात अब्दुल सत्तार यांनी पक्षांतर्गत विरोधकांवर निशाणा साधला.

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून शिवसेनेने संजय शिरसाट यांना मंत्री पदावर संधी दिली. एवढेच नाही तर जिल्ह्याचे पालकमंत्री पदही शिरसाट यांनाच बहाल करण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या आधी (Abdul Sattar) अब्दुल सत्तार हे चार महिने जिल्ह्याचे पालकमंत्री होते. या दरम्यान, शिरसाट-सत्तार यांच्यात फारसे सख्य नव्हते. जिल्हा नियोजन समितीतील निधी सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघात अधिक मंजूर केला, अशी टीका त्यांच्यावर केली गेली.

Abdul Sattar-Sanjay Shirsat News
Abdul Sattar News : निवडणूक संपली आता सोडून द्या; अब्दुल सत्तार यांची रावसाहेब दानवेंना पुन्हा साद!

आता संजय शिरसाट पालकमंत्री झाल्यानंतर सत्तार यांच्या मंजूर कामांना स्थगिती देणार? अशा चर्चा होत्या. परंतु शिरसाट यांच्या नेतृ्त्वाखाली झालेल्या पहिल्या डीपीडीसी बैठकीत कुठलाही वाद झाला नाही, की कोणत्या कामाला स्थगिती देण्यात आली नाही. अगदी शांततेत पार पडलेल्या या बैठकीत सत्तारही शांत बसून होते. संजय शिरसाट यांनी जाहीर कार्यक्रमातून अप्रत्यक्षपणे अब्दुल सत्तार यांच्यावर अनेकदा टीका केली.

Abdul Sattar-Sanjay Shirsat News
Sanjay Shirsat News : सटकली की आपण कुणाच्या बापाचं ऐकत नाही! संजय शिरसाटांनी कोणाचा गेम केला..

पण सत्तार यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पुढील पाच वर्ष जिल्ह्याचा पालकमंत्री मीच राहणार या शिरसाट यांच्या दाव्यावर अब्दुल सत्तार यांनी खोचक टीका केली. तुम्ही दहा वर्ष पालकमंत्री रहावं, मला काही फरक पडत नाही. मी साधा खिलाडी नाही की कोणीही मला डिवचू शकेल, असे म्हणत सत्तार यांनी शिरसाट यांना इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com