Marathwada Politics : जालना लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. महायुती असताना शिवसेनेचे तत्कालीन मंत्री अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचे कल्याण काळे यांचे काम केले. जाहीरपणे आपण दानवे यांच्याविरोधात काम केल्याचे सत्तार सांगत होत. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी रावसाहेब दानवे यांनी सत्तारांना विधानसभा निवडणुकीत जेरीस आणले. पण सत्तार थोडक्यात बचावले. दानवे यांचा सत्तार यांच्यावरील राग अजूनही कायम आहे.
सिल्लोडचे पाकिस्तान झाले आहे, शहरातील चौकांची नावे पहा यावरून सत्तारांची विचारधारा तुमच्या लक्षात येईल, अशी टीका करत दानवे यांनी आपली सत्ताविरोधी मोहिम अधिक प्रभावी केली आहे. विधानसभा निवडणुकीत सत्तार यांच्याविरोधात लढलेले सुरेश बनकर यांनी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केली. या सगळ्या राजकीय घडामोडींवर (Abdul Sattar) अब्दुल सत्तार यांनी भाष्य केले. निवडणूक संपली आहे, आता सोडून द्या. तुम्ही माझ्या विरोधात बोलायचे, मी तुमच्या हे योग्य नाही, असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्याकडे मैत्रीचा हात केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल म्हणजे तुमचे राजकारण संपले असे होत नाही. राजकारण वादविवादाचे नसावे, असे आपण आमचे जावई असलेल्या दाजींना सांगणार आहे. (Raosaheb Danve) राज्यात महायुती आहे, मी युती धर्म पाळतो, त्यांनीही तो पाळावा. बोलताना आपण आचारसंहिता पाळली पाहिजे. आम्ही दोघेही मित्र आहोत, पण आमचे दाजी सध्या नाराज आहेत. टोकाचे राजकार करण्यापेक्षा आपल्या मतदार संघाचा विकास कसा होईल हे पहिले पाहिजे, असा सल्लाही सत्तार यांनी दिला.
रावसाहेब दानवे यांच्या पराभवाला सत्तार जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. हा आरोपही सत्तार यांनी फेटाळला. रावसाहेब दानवे यांचा पराभव करण्याइतका मी मोठा नेता नाही. कुणीतरी त्यांना चुकीचे सांगतो आणि त्यातून गैरसमज निर्माण केले जातात. लोकांमध्ये विष पेरण्याचे काम काही मंडळींकडून निवडणुक काळात आणि अजूनही केले जात आहे. जात-धर्म न पाहता केलेल्या विकास कामांचे मुल्यमापन न करता जातीच्या आधारावर मतदान झाले, अशी खंतही सत्तार यांनी व्यक्त केली.
मी रावसाहेब दानवे यांना काही बोलू शकेन इतका मोठा मी नेता नाही. त्यांच्याबाबत फार मोठा वाद करण्याचा माझा हेतू देखील नाही. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणूकीत आमचे नेते सांगतील त्या पद्धतीने काम करू असेही अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. कन्नडमध्ये संजना जाधव यांच्याविरोधात मी काम केल्याचा आरोप ते आणि आमचेही लोक करतात. उलट मी सगळ्यांना माघार घ्यायला लावून संजना जाधव यांना एकप्रकारे मदतच केली, असा दावा सत्तार यांनी केला.
मी निवडणूक लढणार नाही..
अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपुर्वी मतदारसंघातील एका जाहीर कार्यक्रमात आता आपण पुढची विधानसभा निवडणूक लढणार नाही, असे म्हटले होते. याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मी स्वतःच आता सिल्लोड विधानसभा लढणार नाही. मंत्रिपद भेटले नाही, याबद्दल आपल्याला खंत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी अडीच वर्षानंतर काही मंत्री बदलले जातील, असे सांगितले आहे. त्यामुळे मला पुन्हा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षाही सत्तार यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.