Haribhau Bagde Advice Abdul Sattar : 'तुम्ही दाढी वाढवलीत, आता हजला जाऊन या मग सगळं सुरळीत होईल'! राज्यपाल बागडे नानांचा सत्तारांना सल्ला

Governor Haribhau Bagade advises minister Abdul Sattar to go for Haj, saying everything will become smooth afterward. : 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार अगदी काठावर निवडून आले. महाविकास आघाडीच्या उमेदवाराने त्यांना चांगलाच घाम फोडला होता.
Governor Haribhau Bagde-Abdul Sattar News
Governor Haribhau Bagde-Abdul Sattar NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Politics : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा नुकताच सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा पार पडला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचे ठिकठिकाणी सत्कार होत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेचे प्रदीर्घ काळ संचालक राहिलेल्या बागडे नानांचा बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात सध्या ही बँक आहे. या घरच्या सत्कार समारंभात हरिभाऊ बागडे यांनी अब्दुल सत्तार यांना एक सल्ला दिला. 'अब्दुल सत्तार तुम्ही आता दाढी वाढवलीत तर तुमचं बरं चाललयं, आता एकदा हजला जाऊन या, म्हणजे सगळं सुरळीत होईल, असे बागडे म्हणाले.

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे युती सरकारमध्ये कृषी, अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री होते. त्यांची मंत्रीपदाची कारकीर्द बरीच वादग्रस्त ठरली. या वादामुळेच त्यांना महायुती सरकारमध्ये पुन्हा संधी मिळाली नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी अब्दुल सत्तार यांना वडिलकीचा सल्ला देत आता राज्यातील परिस्थिती बदलली आहे, पहिल्यासारखी राहिली नाही. त्यामुळे एकदा हजला जाऊन या म्हणजे सगळं सुरळीत होईल, असे सांगीतले. सत्तार यांनी त्यांच्या या सल्ल्यावर हात जोडत दुजोरा दिला.

बागडे नाना यांनी वयाची 80 वर्ष पूर्ण केल्यानंतर नुकताच त्यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा साधू-संत-महंत व वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. अब्दुल सत्तार हे या कार्यक्रमातही सहभागी होऊन बागडे यांना शुभेच्छा देऊन आले होते. तेव्हाही बागडे (Haribhau Bagde) यांनी सत्तार यांच्या वाढत्या दाढीवरून प्रश्न केला होता. आज जिल्हा बँकेच्या कार्यक्रमातही त्यांनी याचा उल्लेख करत त्यांना हजला जाण्याचा सल्ला दिला. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार अगदी काठावर निवडून आले. महाविकास आघाडीच्या उमेदवाराने त्यांना चांगलाच घाम फोडला होता.

Governor Haribhau Bagde-Abdul Sattar News
Haribhau Bagde Birthday News : वारकऱ्यांच्या पंगतीत शोभणारा नेता म्हणजे 'हरिभाऊ बागडे' त्यांचा शताब्दी सोहळा पाहण्याचे भाग्य लाभो!

कसा बसा विजय मिळवल्यानंतर मंत्रीपदाच्या आशेवर असलेल्या सत्तारांना नव्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे सध्या सत्तार हे आपल्या मतदारसंघात सर्वाधिक वेळ देत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद, नगरपरिषद निवडणुकीत आपली पकड मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बागडे नाना यांच्या सत्कार सोहळ्यात अब्दुल सत्तार यांनीही आपल्याला साजेसे असे भाषण करत चिमटे काढले.

Governor Haribhau Bagde-Abdul Sattar News
Abdul Sattar News : अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातून शिवसेना एकत्रिकरणाची सुरवात का? संख्याबळ कमी तरी उद्धवसेनेला सभापतीपद!

नाना इतकं मांझ भाग्य नाही..

राज्यपाल बागडे नाना यांनी मोठ्या कष्टाने दूध संघ चालवला. तसेच सहकार बँक नफ्यात येण्यासाठी आपला अनुभव पणाला लावला. ते चारवेळा आमदार झाले, त्यांना विधानसभा अध्यक्षपद आणि आता राज्यपाल होण्याचा मान मिळाला. मी पाच वेळा आमदार झालो, पण माझं त्यांच्या इतकं भाग्य नाही, अशी मिश्किल टिप्पणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com