Abdul Sattar News : अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातून शिवसेना एकत्रिकरणाची सुरवात का? संख्याबळ कमी तरी उद्धवसेनेला सभापतीपद!

Shiv Sena unification efforts begin in Sillod, the stronghold of Abdul Sattar. Surprisingly, Uddhav Thackeray’s faction secures the chairman post : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांना सोबत घेत अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघावरील आपली पकड मजबूत केली.
Abdul Sattar-Shivsena-Soygaon News
Abdul Sattar-Shivsena-Soygaon NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News :अडीच वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीस आमदारांनी बंड पुकारले आणि शिवसेनेत मोठी फूट पडली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि भाजप- शिंदेंची सत्ता येऊन ते मुख्यमंत्री झाले. तीन वर्षानंतर पुन्हा राज्यातील वातावरण फिरले असून शिवसेना एकत्रिकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, अशी इच्छा व्यक्त केली.

अंबादास दानवे यांनी इच्छा व्यक्त करण्यापूर्वीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड- सोयगाव मतदार संघामध्ये शिवसेना एकत्रिकरणाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. माजीमंत्री तथा सिल्लोडचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सोयगाव तालुक्यातील खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी युती करत एकत्रित पॅनल दिले. या पॅनलने 17 पैकी 14 जागा जिंकल्या, तर माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शिंदे यांच्याच शिवसेनेच्या कन्नडच्या विद्यमान आमदार संजना जाधव यांच्या पॅनलला रोखण्याची यशस्वी खेळी केली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांना सोबत घेत अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघावरील आपली पकड मजबूत करण्यासाठी स्थानिक पातळीवर केलेल्या या प्रयोगाची चर्चा सध्या जिल्हाभरात सुरू आहे. सोयगाव खरेदी विक्री संघावर गेल्यावेळी राजेंद्र राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचीच सत्ता होती. अब्दुल सत्तार यांच्याशी हातमिळवणी करत राठोड यांनी पुन्हा सत्ताही राखली आणि एकाने संख्याबळ असून सभापती पदही पटकावले. विशेष म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेतही या निवडणुकीत दोन गट पडल्याचे दिसून आले.

Abdul Sattar-Shivsena-Soygaon News
Shivsena Politic's : उद्धव ठाकरे अन्‌ एकनाथ शिंदेंच्या एकत्र येण्याबाबत शिवसेना मंत्र्याचे मोठे विधान; म्हणाले ‘ते दोघेही मिठ्या मारतील...’

कन्नडच्या विद्यमान आमदार संजना जाधव आणि त्यांचे वडील रावसाहेब दानवे यांच्या भाजपच्या पॅनलची युती होती. मात्र या दोघांना रोखण्यासाठी अब्दुल सत्तार आणि राजेंद्र राठोड यांनी एकत्र येत केलेल्या खेळीने 17 पैकी भाजपच्या वाट्याला केवळ चार जागा आल्या. सत्तार यांनी 13 पैकी सात जागा तर राजेंद्र राठोड यांच्या शिवसेनेने सहा जागा पटकावल्या. सत्तार गटाची एक जागा अधिक आलेली असताना त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत राजेंद्र राठोड यांच्याशी असलेले आपले जिव्हाळ्याचे संबंध जपले आणि त्यांना सभापती पदाची संधी बहाल केली.

Abdul Sattar-Shivsena-Soygaon News
Ambadas Danve News : शिवसेना फुटली, ती पुन्हा एकत्र आली पाहिजे! अंबादास दानवेंची इच्छा..

तर उपसभापती पद आपल्याकडे ठेवत भविष्यात दोन्ही शिवसेनेची युती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही कायम राहील, याची काळजी घेतल्याचे दिसून आले. अब्दुल सत्तार यांचे राजकारण नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. सत्तेसाठी ते कुठल्याही तडजोडीला तयार असतात हेच या छोट्याशा निवडणुकीत पुन्हा एकदा दिसून आले. राज्यामध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर नव्या मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार यांना स्थान मिळाले नाही. विधानसभा निवडणुकीत अवघ्या 2420 मतांनी विजय झाल्यानंतर सत्तारांना धक्का बसला.

Abdul Sattar-Shivsena-Soygaon News
Abdul Sattar : राज्यात गोंधळ, गल्लीत मुजरा! अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडमध्ये शिंदे-ठाकरेंची शिवसेना एकत्र..

सत्तार यांचे कमबॅक..

मतदारसंघात झालेली ही हानी भरून काढण्यासाठी गेल्या वर्षभरापासून अब्दुल सत्तार हे मतदार संघात पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. अशावेळी सोयगाव खरेदी विक्री संघावर सत्ता मिळवत अब्दुल सत्तार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आपण सज्ज झाल्याचे विरोधकांना पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. या निमित्ताने दोन्ही शिवसेना एकत्र आल्याचे चित्रही दिसले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना एकत्रिकरणाच्या चर्चा सुरू असताना सिल्लोडमध्ये झालेला हा प्रयोग भविष्यात राज्य पातळीवरही दिसतो का? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

Abdul Sattar-Shivsena-Soygaon News
Eknath Shinde: आधी ठाकरेंना 'CM' बनण्याचा आशीर्वाद; आता तेच शंकराचार्य म्हणतात,एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरांनी...!

सोयगाव येथे तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी राजेंद्र राठोड यांची तर व्हाईस चेअरमन पदी रंगनाथ वराडे यांची निवड झाली.या निवडीची घोषणा होताच माझ्या सोयगाव येथील जनसंपर्क कार्यालयासमोर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी नवनिर्वाचित चेअरमन राजेंद्र राठोड, व्हाईस चेअरमन रंगनाथ वराडे तसेच नवनिर्वाचित संचालक यांच्या उपस्थितीमध्ये सोयगाव शहरात भव्य विजय रॅली काढण्यात आली होती . याप्रसंगी नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांना शुभेच्छा दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com