Nilangekar-Solunke Controversy : निलंगेकर साहेबांच्या मुलाने आणि नातवानेच त्यांची अब्रू घालवली; अभय साळुंकेंचा पलटवार

Abhay Salunke's response to Ashok Patil Nilangekar's allegations : दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची अब्रु त्यांच्याच मुलाने आणि नातवाने घालवल्याचा आरोप साळुंके यांनी केला. उलट साहेबांच्या विचारांचा वारसा जपून आम्ही तीनही तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्ते खरे निष्ठावंत आहोत.
Nilanga Congress News
Nilanga Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

राम काळगे

निलंगा : स्वतःला डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे वारस म्हणणाऱ्यांना 'अब्रू नुकसान' हा शब्द उच्चारण्याचा नैतिक अधिकार नाही. कारण कारखाने व बँका बुडवून लोकांना फसवत एकमेकांवर 420 चे गुन्हे दाखल करून साहेबांची मुलं व नातवांनीच साहेबांची 'आब्रु' घालवण्याचे पाप केले आहे, असा पलटवार काँग्रेसचे निलंगा मतदार संघातील पराभूत उमेदवार अभय साळुंके यांनी अशोक पाटील निलंगेकर यांच्यावर केला.

निवडणुक काळात आपल्यावर व कुटुंबावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याचा आरोप करत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांनी अभय सांळुके यांच्यावर अब्रुनूकसानाची दावा ठोकरणार असल्याचे सांगितले होते. (Congress) सकाळी पत्रकार परिषद घेत निलंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

Nilanga Congress News
Nilanga Congress Politics : निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर...

यावर आता साळुंके यांनी पलटवार करत निलंगेकर काका-पुतण्यावर निशाणा साधला आहे. दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची अब्रु त्यांच्याच मुलाने आणि नातवाने घालवल्याचा आरोप साळुंके यांनी केला. (Latur) उलट साहेबांच्या विचारांचा वारसा जपून आम्ही तीनही तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्ते खरे निष्ठावंत आहोत.

Nilanga Congress News
Ashok Patil Nilangekar News : जॅकेट अन् टोपी घालून कोणी वारस ठरत नाही, मीच निलंगेकरांचे खरा राजकीय वारस..

आणि मी तर 2019 ला डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्यासमोर शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसच्या प्रचार सभेत 'डॉ निलंगेकर साहेब हे निलंगा काँग्रेसचे निष्ठावंत नेतृत्व' होते व आजपासून निलंग्याचं काँग्रेसचे निष्ठावंत नेतृत्व अभय साळुंकेच आहे, असे जाहीर केले होते. डॉ. निलंगेकर साहेबांनीच माझ्या नेतृत्वाला संमती दिली होती.

Nilanga Congress News
Latur BJP News : लातूर जिल्ह्यात मंत्रिपदासाठी मोठी स्पर्धा; निलंगेकर, पवार अन् कराडही रांगेत..

त्यामुळे पक्षविरोधी काम करणाऱ्यांच्या वक्तव्याला मी फारसं महत्त्व देत नाही. तालुक्यातील जनतेला व कार्यकर्त्यांना सगळे माहीत आहे. मला गुंड व अशिक्षित म्हणणारांवर मीच अब्रुनुकसानीचा दावा करेन, असा इशाराही अभय साळुंके यांनी दिला आहे. एकूणच निलंगेकर-साळुंके संघर्ष येणाऱ्या काळात आणखी भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com