Cockroach Janata Party : कॉक्रोच जनता पार्टीत फूट? आम्हाला मिटिंगला का बोलावले नाही म्हणत तीन कार्यकर्ते अभिजीत दिपकेंच्या घरासमोर बसले...

Abhijeet Dipke, CJP, Chhatrapati Sambhajinagar, party workers protest : ‘आम्हीही लाठ्या खाल्ल्या, मग निर्णयात आमचा सहभाग का नाही?’ कॉकरोच जनता पक्षाच्या बैठकीत नातेवाईक व मित्रांना प्राधान्य, कार्यकर्त्यांचा संताप अन् गटबाजीच्या चर्चा.
Abhijeet Dipke
Abhijeet DipkeSarkarnama
Published on
Updated on

CJP Party Meeting : दिल्लीच्या जंतरमंतरवरील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर भविष्यात विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर, शिक्षण व परीक्षा पद्धतीवर नेमकी काय रणनिती असावी, पुढील वाटचाल कशी असावी? या संदर्भात कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी पक्षाच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

पहिल्या दिवशी ही बैठक सुरळीत पार पडली, मात्र गुरूवारी सकाळी पुन्हा बैठक सुरू होताच काही वेळातच अभिजीत दिपके यांच्या घरासमोर गोंधळ सुरू झाला. राहुल पांड्या, मनिष ब्रम्हभट व इतर तीन गुजरातमधील कार्यकर्त्यांनी देशातील तरुणांनी उभारलेल्या आणि यशस्वी केलेल्या आंदोलनानंतर पुढील वाटचाल ठरवताना मोजके लोक निर्णय कसा घेऊ शकतात?, असा सवाल केला.

आंदोलन एका चेहऱ्याचे होऊ नये, जे निर्णय घ्यायचे ते सर्वांना सोबत घेऊन झाले पाहिजे, अशी मागणी करत या आंदोलकांनी दिपके यांच्या घरासमोर आंदोलन सुरू केल्याने एकच गोंधळ उडाला. यामुळे पोलिसांची धावपळ उडाली, सीजेपी पक्षात फूट पडली आहे का? अशा चर्चा या गोंधळानंतर सुरू झाल्या आहेत.

Abhijeet Dipke
Supreme Court news : सुप्रीम कोर्टात सिब्बलांनी मुद्द्यालाच हात घातला; शिवसेनेच्या सहा खासदारांसह 33 खासदारांचे भवितव्य काय?

आंदोलकांनी अभिजीत दिपके यांच्या घरी होत असलेल्या बैठकीत त्याचे नातेवाईक, काॅलेज मधील मित्र आणि काही मोजके लोक सहभागी होत आहेत. या आंदोलनात देशभरातील विद्यार्थी उतरले होते, आम्हीही जंतरमंतरवर लाठ्या खाल्या. त्यामुळे भविष्यात पुढे काय? याची दिशा ठरवायची असेल तर सगळ्यांना सोबत घेत आणि प्रत्येकाच्या विचाराने निर्णय घेणे अपेक्षित आहे, असे या कार्यकर्त्यांच म्हणणे होते.

सीजेपीमध्ये आतापासूनच परिवारवाद सुरू होत असेल तर तो आम्ही खपवून घेणार नाही. बैठकीत आम्हालाही बोलवा, अशी मागणी आम्ही काल रात्रीपासून करतो, अनेक बैठकीत सहभागी पदाधिकाऱ्यांनी आम्हाला पाहून दुर्लक्षित केले. फक्त प्रवक्त्यांना बैठकीत बोलावण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात बैठकीमध्ये त्यांचे नातेवाईक, काॅलेजमधील मित्र, व इतर लोक सहभागी आहेत, असा दावाही कार्यकर्त्यांनी केला.

Abhijeet Dipke
Uma Shankar Singh : बहुजन समाज पक्षाचे उत्तर प्रदेशातील एकमेव आमदार उमाशंकर सिंह यांचे निधन

हा भेदभाव कशासाठी? असा सवाल या आंदोलकांनी उपस्थितीत केला. तसेच अभिजीत दिपके यांच्या घरासमोरच धरणे देण्याचा निर्णय घेत ठिय्या दिला. या अचानक निर्माण झालेल्या गोंधळाने या आंदोलकांना दिपके यांच्या घरासमोर आंदोलन करण्यास मज्जाव केला. सीजेपीच्या कार्यकर्त्यांकडूनच बैठकीच्या सहभागावरून फूट पडल्याचे यावरून दिसून आले.

बैठकीसाठी निमंत्रण न मिळाल्याने संताप व्यक्त करत या कार्यकर्त्यांनी 'आम्ही पार्टीचे सदस्य असूनही आम्हाला का बोलावले नाही'? असा सवाल केला. आम्ही पार्टीचाच अविभाज्य भाग असल्याचा दावाही या आंदोलकांनी केला. दरम्यान, या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com