Uma Shankar Singh : बहुजन समाज पक्षाचे उत्तर प्रदेशातील एकमेव आमदार उमाशंकर सिंह यांचे निधन

Uma Shankar Singh, BSP MLA, Mayawati, BSP news : पूर्व उत्तर प्रदेश म्हणजे पूर्वांचलमधील मातब्बर नेत्यांमध्ये उमाशंकर सिंह यांचे नाव घेतले जायचे. बलियासह शेजारील जिल्ह्यांमध्ये त्यांचे संघटनात्मक नेटवर्क खूप प्रभावी होते.
Uma Shankar Singh
Uma Shankar SinghSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh MLA : बहुजन समाज पक्षाचे आमदार उमाशंकर सिंह यांचे बुधवारी रात्री दिल्लीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते उत्तर प्रदेश विधानसभेतील पक्षाचे एकमेव आमदार होते. मागील दोन वर्षांपासून ते कॅन्सरशी झूंज देत होते. अखेर बुधवारी वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

उमाशंकर यांनी उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील रसडा विधानसभा मतदारसंघातून सलग तीनदा विजय मिळविला होता. पूर्व उत्तर प्रदेशात त्यांचा दबदबा होता. २०१२ पासून ते आमदार होते. २०१७ आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यात भाजपची लाट होती. या लाटेत मायावती अध्यक्ष असलेल्या बहुजन समाज पक्षाचे पानिपत झाले होते. पण उमाशंकर यांनी या लाटेतही आपले वर्चस्व कायम राखले होते.

मायावती यांच्या पक्षाला २०२२ मध्ये केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. हा मतदारसंघ होता उमाशंकर यांचा रसडा. विधानसभेतील ४०३ आमदारांमध्ये बसपाचे ते एकमेव आमदार होते. जवळपास चार वर्षे त्यांनी एकट्याने विधानसभेत पक्षाचा आवाज कायम ठेवला होता. त्यांच्या निधनामुळे मागील अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच विधानसभेत बसपाचा एकही आमदार नसेल.

Uma Shankar Singh
Bihar 2009 bypoll : बिहारमध्ये 'एनडीए'ला 17 पैकी 12 जागांवर झटका अन् काही महिन्यांतच विरोधकांना धडकी भरविणारा विजय...

पूर्वांचलचे रॉबीन हूड

पूर्व उत्तर प्रदेश म्हणजे पूर्वांचलमधील मातब्बर नेत्यांमध्ये उमाशंकर सिंह यांचे नाव घेतले जायचे. बलियासह शेजारील जिल्ह्यांमध्ये त्यांचे संघटनात्मक नेटवर्क खूप प्रभावी होते. बहुजन समाज पक्षाचे या भागातील रॉबीन हूड म्हणून समर्थक त्यांचे कौतुक करायचे. अखेरपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहत त्यांनी एक आदर्श घालून दिला.

Uma Shankar Singh
लाखो फॉलोअर्स, पण एक चूक भोवली अन् द्यावा लागला सरकारी नोकरीचा राजीनामा!

मायावती यांनीही उमाशंकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना त्यांच्या पक्षनिष्ठेचे कौतुक केले. बसपामध्ये प्रवेश केल्यापासून उमाशंकर यांनी पक्षाची अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि समर्पित भावनेने सेवा केली. ते केवळ आपल्या मतदारसंघापुरते मर्यादित राहिले नाहीत, तर समाजाच्या हितासाठीही सातत्याने प्रयत्न केले. पक्षाचे खऱ्याअर्थाने एकनिष्ठ कार्यकर्ते होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com