CJP Protest: 'सीजेपी'च्या अभिजीत दिपकेंच्या आणखी एका आंदोलनाला यश; 'स्कूल ठीक करो' अभियानाचा पहिला दणका

Hingoli School Theek Karo Campaign: हिंगोली या आपल्या गावातून अभियानाला सुरूवात केल्यानंतर दिपके दुसऱ्यांदा हिंगोलीत आले. मद्यपी मुख्याध्यापकाला निलंबित करा, अशी मागणी करणाऱ्या विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या आंदोलनाला अभिजीत दिपके यांनी पाठिंबा दर्शवत सहभाग नोंदवला.
Abhijeet Dipke  .jpg
Abhijeet Dipke .jpgSarkarnama
Published on
Updated on

Hingoli ZP School : काॅक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी स्वातंत्र्य दिनापासून सुरू केलेल्या 'स्कूल ठीक करो' अभियानाची देशभरात चर्चा होत आहे. ग्रामीण भागातील शाळांची दुरावस्था, विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या अपुऱ्या सुविधा, शाळांमधील शिक्षकांचं बेजबाबदार वागणं यासह इतरही समस्यांना वाचा फोडण्यासाठी दिपके यांनी ही मोहीम सुरू केली.

हिंगोली या आपल्या गावातून अभियानाला सुरूवात केल्यानंतर दिपके दुसऱ्यांदा हिंगोलीत आले. मद्यपी मुख्याध्यापकाला निलंबित करा, अशी मागणी करणाऱ्या विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या आंदोलनाला अभिजीत दिपके यांनी पाठिंबा दर्शवत सहभाग नोंदवला.

अनेक वर्षापासून जर हा मद्यपी मुख्याध्यापक शाळेत येत होता, लोक, पालक, विद्यार्थी तक्रार करत होते, तर तुमच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी इतकी वर्ष काय केले? असा सवाल दिपके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केला.

देशी दारूची बाटली घेऊन मुख्याध्यापक शाळेत यायचा, त्याच अवस्थेत विद्यार्थ्यांशी बोलायचा. तुमची मुलं-मुली जर या शाळेत असती तर तुम्ही कारवाईला इतका वेळ लावला असता का? असा सवाल दीपके यांनी केला. आंदोलन उग्र रुप धारण करत असल्याचे लक्षात येताच शिक्षण विभागाने लिंबाळा गावातील शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित केले आहे.

Abhijeet Dipke  .jpg
Ganesh Naik Manda Mhatre row : 'बाहेरच्या लोकांची लुडबुड खपवून घेणार नाही'; मंदा म्हात्रेंचा गणेश नाईकांना अप्रत्यक्ष टोला

या संदर्भात स्वत: दिपके यांनी व्हिडिओद्वारे माहिती दिली. त्यांनी हा विजय लिंबाळा गावचे ग्रामस्थांचा असल्याचे म्हटले आहे. लिंबाळा गावातील ग्रामस्थांसाठी हा पहिला मोठा विजय आहे. ग्रामस्थांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आज हा निर्णय झाला अन्यथा हा निर्णय झाला नसता.

आपल्याला असंच पुढे येऊन लढायचं आहे. आता केवळ मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. आपल्याला शाळेत शिक्षकांचा स्टाफ हवा आहे, नवीन बाक हवे आहेत. हे जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवायचे आहे, असेही अभिजीत दीपके यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com