Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुक लढवितांना विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला पाहिजे. लोकांसाठी केलेली कामे आणि भविष्यात त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय व्हिजन आहे? यावर बोलले पाहिजे. मात्र असे न होता विरोधी उमेदवार माझ्यावर शिवराळ भाषेत टीका करीत आहेत. शिवराळ भाषा वापरणे हे तुमच्यावर झालेले संस्कार दर्शवितात. तुम्ही माझ्यावर कितीही शिवराळ भाषा वापरली तरी मी तुम्हाला माझा मोठा भाऊच मानतो.
मी केलेल्या कामाला घेऊन लोकांपुढे जात मते मागत आहे. जर तुम्ही तुमच्या दहा वर्षांच्या काळात लोकहिताचे कामे केली असतील तर ती घेऊन लोकांसमोर जावा आणि कौल मागा. शिवराळ भाषेत टीका करणाऱ्यालाही भाऊ मानणे हे माझ्यावर झालेले संस्कार असल्याचा टोला भाजपा महायुतीचे उमेदवार (Abhimanyu Pawar) आमदार अभिमन्यू पवारांनी विरोधी उमेदवाराला लगावला.
उजनी येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. (BJP) यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने, तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे, कोळी महासंघाचे अध्यक्ष चैतन्य पाटील, काकासाहेब मोरे, सेनेच्या रंजना कुलकर्णी, अर्चना बिराजदार, हणमंत राचट्टे, संगमेश्वर ठेसे, बसवराज धाराशिवे, प्रवीण कोपरकर आदी उपस्थित होते.
गेल्या पाच वर्षात मी केलेल्या कामांची लिस्ट घेऊन येतो तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही तुमच्या दहा वर्षाच्या काळामध्ये काय कामे केली ते सांगा. मतदारसंघातील प्रश्नांना घेऊन मी विधानसभेत भांडलो आहे, दिवसरात्र विकासाचा ध्यास घेऊन औसा ते मुंबई असा प्रवास केला. त्यामुळे माझे सर्वाधिक मुक्काम रेल्वेत झाले. तुमचे मुक्काम कुठे होत होते हे सांगायला लावू नका. लोकांना हे सर्व माहीत असल्याचे ते म्हणाले.
लोकांनी निवडून दिल्यावर लोकप्रतिनिधींनी कामे करणे अपेक्षित असते. उमेदवार निवडतांना मतदारांनी उमेदवाराच्या कामाचे मूल्यमापन करून कामाचा माणूस निवडणे लोकशाहीसाठी गरजेचे आहे. अभिमन्यू पवारांनी विकास करताना समजतील सर्व घटकांना न्याय दिल्याने ते पुन्हा प्रचंड मातधिक्य घेत निवडून येतील असा विश्वास, माजी मंत्री भाजप नेते बसवराज पाटील यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.