Santosh Deshmukh Case : देशमुखांची हत्या करून आरोपी थेट गुजरातमधील मंदिरात आश्रयाला, जवळचे पैसे संपल्यामुळे पोलिसांना लागला सुगावा

Santosh Deshmukh Murder Case : पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता देशमुख यांची हत्या केल्यानंतर ते कुठे पळून गेले आणि ते पोलिसांच्या जाळ्यात कसे अडकले याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या करून हे आरोपी गुजरातला गेल्याची माहिती समोर आली आहे.
Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case Sarkarnama
Published on
Updated on

Beed Crime News, 05 Jan : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना शनिवारी (ता.4) बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली. या दोघांना आता 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी या आरोपींची चौकशी केली असता देशमुख यांची हत्या केल्यानंतर ते कुठे पळून गेले आणि ते पोलिसांच्या जाळ्यात कसे अडकले याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या करून हे आरोपी गुजरातला (Gujarat) गेले आणि त्यांनी एका देवस्थानात मुक्काम केल्याची माहिती समोर आली आहे.

तर या आरोपींजवळचे पैसे संपल्यामुळे ते पुण्याला (Pune) आले आणि पोलिसांच्या तावडीत सापडल्याचंही सांगितलं जात आहे. तसंच धारूर तालुक्यातील डॉ. संभाजी वायबसे आणि अॅड. सुरेखा वायबसे या दाम्पत्याची चौकशी केल्यानंतर पोलिसांना या आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी मदत झाल्याचं सुत्रांनी सांगितलं.

Santosh Deshmukh Case
Beed Police : "मी प्रेस घेतली तर खासदाराची चड्डी सुद्धा..."; बजरंग सोनवणे यांच्याविरोधात पोलिसाने केलेली 'ती' वादग्रस्त पोस्ट व्हायरल

देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपी कुठे गेले?

9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे (Sudarshan Ghule, Sudhir Sangle and Krishna Andhale) हे तिघेही फरार होते. या तिघांना शोधण्यासाठी बीड पोलिसांसह सीआयडीची दमछाक झाली होती. शिवाय या आरोपींना शोधून देणाऱ्यांना पोलिसांकडून बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं होत. मात्र, तरीही त्यांना पकडण्यात पोलिसांना आलं.

त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेत काही सत्ताधारी आमदारांसह विरोधकांनी मोर्चे काढत पोलिसांवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिस (Police) अधीक्षकांनी आरोपींच्या अटकेचे आश्वासन दिले होते. त्यानंतर अखेर शनिवारी तीन फरार आरोपींपैकी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh : 9 जानेवारीला राज्यभरातील ग्रामपंचायती बंद! संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांबाबत सरपंच परिषदेने केली 'ही' मोठी मागणी

पैसे संपले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले

मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख यांची हत्या केल्यानंतर घुले, आंधळे आणि सांगळे हे तिघेही आरोपी एकत्रच होते. रेल्वेने ते गुजरातमध्ये गेले. तेथील एका शिवमंदिरात जवळपास 15 दिवस राहिले. मंदिरातच जेवण करायचं आणि झोपायचं असा त्यांचा दिनक्रम सुरू होता. मात्र नंतर या तिघांजवळचे पैसे संपल्यामुळे कृष्णा आंधळे हा पैसे आणण्यासाठी महाराष्ट्रात आला होता

एका माणसाकडून पैसे घेऊन तो गुजरातला माघारी जाणार होता. मात्र, तो येण्याआधीच सुदर्शन घुले आणि सांगळे दोघेही पुण्याला आले. यावेळी ते एका व्यक्तीची भेट देखील घेणार होते. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र, कृष्णा आंधळे यांच्यासोबत नसल्याने तो पोलिसांना तावडीत सापडला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com