Eknath Shinde News : सरकारची ताकद वाढवा, तुम्हाला देतांना हात आखडता घेणार नाही

Acknowledgment of the work done by the grand coalition government, Chief Minister's appeal to beloved sisters : योजनेला विरोध करणारे, ती बंद होईल, पैसे मिळणार नाही, असे सांगून दिशाभूल करणाऱ्या विरोधकांना, सावत्र भावांना येणाऱ्या निवडणुकीत जोडा दाखवा.
CM Ladki Bahin Yojana
CM Ladki Bahin YojanaSarkarnama
Published on
Updated on

CM Ladki Bahin Yojana News : गेल्या दोन-सव्वा दोन वर्षात आधीच्या महाविकास आघाडी सरकारने केलेले काम आणि महायुती सरकारच्या काळात झालेली कामे, राबण्यात आलेल्या योजनांची तुलना करा, दुध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल. आधीचे सरकार हप्ते घेणारे होते, आम्ही हप्ते देणारे आहोत. तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत सरकारची ताकद वाढवा, आम्हीही तुम्हाला देताना हात आखडता घेणार नाही, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणींना साद घातली.

कोणाचा बाप आला तरी लाडकी बहीण योजना बंद करू शकणार नाही, असे सांगत शिंदे यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. `मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण` योजनेच्या मेळाव्यात (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या अडीच वर्षातील कामाचा लेखाजोखा मांडला. लाडकी बहीण योजना ही महिलांना सक्षम करण्यासाठी आणली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचे कौतुक करत ही योजना देशाला दिशा देणारी असल्याचे म्हटले आहे.

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी योजनेचे कौतुक केले. मग विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देण्याची गरज नाही, असेही शिंदे म्हणाले. लाडकी बहीण योजनेचे आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे पैसेही आम्ही अॅडव्हान्स दिले, असे सांगत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या, सरकारची ताकद वाढवा, धनुष्यबाण, कमळ, घड्याळ ही खून लक्षात ठेवा असे आवाहन मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीही केले.

CM Ladki Bahin Yojana
Eknath Shinde, Devendra Fadnavis : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळताच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

पुर्वीच सरकार हप्ते घेणारे होते आमचे हप्ते भरणारे आहे. योजनेला विरोध करणारे, ती बंद होईल, पैसे मिळणार नाही, असे सांगून दिशाभूल करणाऱ्या विरोधकांना, सावत्र भावांना येणाऱ्या निवडणुकीत जोडा दाखवा. (CM Ladki Bahin Yojana) आमच्या बहीणींच्या नादाला लागाल तर विरोधी पक्षाचे डिपाॅझीट जप्त होईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून दिला. चांगल्या योजनांच्या विरोधात कोर्टात जातायेत.

कुणाचा बाप आला तरी योजना बंद होणार नाही. पैशाची तरतूद केली आहे, निवडणुक आली म्हणून योजना आणलेली नाही. बहिणींच्या संसाराला हातभार लावायचा म्हणून योजना आणली. आमची नियत साफ आहे, तुम्ही सरकारची ताकद वाढवा, आम्ही तुम्हाला देतांना हात आखडता घेणार नाही, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांना वीज बील माफ केल्याचे सांगातनाच लोकसभेला त्यांनी तुम्हाला फसवलं, आम्ही फसवणार नाही. फक्त केलेल्या कामाची पोच पावती आम्हाला द्या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेळाव्याला उपस्थित बहिणींना केले.

CM Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणी'मुळे सरकारवर आठवड्याला तीन हजार कोटींचे कर्ज?

धनुष्यबाण, कमळ, घड्याळ लक्षात ठेवा..

अर्थसंकल्पात दिलेल्या आतापर्यंतच्या योजनांमध्ये सर्वात लोकप्रिय योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असल्याचा उल्लेख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात केला. राज्यात महिलांमधील उत्साह वाखाणण्या जोगा आहे. पैसे मिळाल्याचा आनंद माय-भगिणींच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतो आहे. विरोधक टीका करतात, योजना बंद होणार अशी दिशाभूल करतात. पण मी अर्थमंत्री म्हणून सांगतो, लाडकी बहीण, तीन गॅस सिलेंडर, गरीबांच्या मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या योजना सुरू राहणार आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना मतदान करावे लागेल.

कमळ, धनुष्यबाण, घड्याळ या तीन खुणा माझ्या मायमाऊलींनो लक्षात ठेवा. वचनपुर्तीचे राजकारण करणारे आम्ही राजकारणी आहोत, असेही अजित पवार म्हणाले. तर शेतकऱ्यांना आता पुढची पंचवीस वर्ष चिंता नाही. वीज बील शून्य आणि साठ हजार सौर पंपाचे वाटप करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक सौर पंप दिले आहेत. आमच्या पाठीशी लाखो बहिणी असल्याने तुमचे सरकार येणारच नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. तुमचा आशिर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. मराठवाड्याचा दुष्काळ भुतकाळ होईल, पुढच्या पाच सात वर्षात 55 टीएमसी पाणी मिळेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com