Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणी'मुळे सरकारवर आठवड्याला तीन हजार कोटींचे कर्ज?

Ladki Bahin Yojana 3000 crores per week loan : माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आत्तापर्यंत 1 कोटी 85 लाख महिलांना झाला आहे. या योजनेतून महायुती सरकार पुन्हा येईल, असा विश्वास महायुतीमधील नेते व्यक्त करत आहेत.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSarkarnama
Published on
Updated on

Ladki Bahin Yojana News: विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेमध्ये महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. चार महिन्यांचे हफ्ते सरकारने महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. मात्र, या योजनेमुळे सरकारवर कर्जाचा डोंगर होत असल्याची माहिती आहे.

लाडकी बहीण योजनेमुळे सरकारला दर आठवड्याला तीन हजार कोटींचे कर्ज घ्यावे लागत असल्याचे वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे. तिजोरीत खडखडाट असल्याने सरकार रिझर्व्ह बँकेचे दार ठोठावत असल्याची देखील माहिती आहे.

माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आत्तापर्यंत 1 कोटी 85 लाख महिलांना झाला आहे. या योजनेतून महायुती सरकार पुन्हा येईल, असा विश्वास महायुतीमधील नेते व्यक्त करत आहेत. तर, विरोधकांडून महायुती पुन्हा सत्तेत येणार नसल्याचे पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप करण्यात येतो आहे.

Ladki Bahin Yojana
Pune Crime Sexual Assault Video: पुण्यात बदलापूर घटनेची पुनरावृत्ती; सहा वर्षांच्या दोन चिमुरडींवर अत्याचार, बसचालकच...

भाजप आमदाराने भर कार्यक्रमात लाडकी बहीण योजना ही निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन आणल्याचे म्हटले होते. निवडणुकीत मत मिळावीत म्हणून ही योजना असल्याचे देखील म्हटले होते. आमदार रवी राणा यांनी ज्या बहिणी आम्हाला मत देणार नाही त्यांना पैसे मिळणार नसल्याचे म्हटले होते.मात्र, महायुतीमधील नेत्यांनी सारवासरव करत महिलांना पैसे मिळणार हे स्पष्ट केले होते.

इतर योजनांसाठी पैसे नाहीत?

सबसिडीचा पैसा लाडकी बहीण योजनेला द्यावा लागत आहे. त्यामुळे इतरांची सबसिडी अडकली आहे. काही दिवसांअगोदर टेक्सटाइल उद्योगांना पॉवर सबसिडी मिळाली नव्हती. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत आले आहेत. या गोष्टी लक्षात घेता, उद्योगांनी स्वत:च्या भरवशावर नियोजन करावे, असा सल्ला देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इतर योजनांचे पैसे, सबसीडी लाडकी बहीण योजनेकडे वळवल्याचे अप्रत्यक्ष सांगितले होते.

Ladki Bahin Yojana
Bhausaheb Bhoir: अजितदादांनी सरड्यांचे डायनासोर तयार केले; साथ सोडतानाच भाऊसाहेब भोईर बरसले! VIDEO पाहा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com