Dhananjay Munde VS NCP : मुंडेंविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून धरपकड; नेमक झालं काय?

Beed News : मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नगरहून परळीला गेले आहेत.
Dhananjay Munde VS NCP
Dhananjay Munde VS NCPSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Politics : अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेत सहभागी झाले. यानंतर शपथ घेतलेले मंत्री आपापल्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात परतत असताना त्यांचे वाटेत समर्थक कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.

बीड जिल्ह्यातील परळी-वैजनाथचे प्रतिनिधित्व करणारे धनंजय मुंडे यांनीही अजित पवारांसोबत कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र काल (13 जुलै) नगर मार्गे परळीकडे जात असताना वाटेत जामखेड इथे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या काही कार्यकर्त्यांनी जामखेड शहरातून धनंजय मुंडे यांचा ताफा जात असताना त्यांच्या ताफ्यासमोर शरद पवार यांचे फोटो झळकवत घोषणाबाजी केली. घोषणाबाजी करणाऱ्या या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Dhananjay Munde VS NCP
Supreme Court MLA Disqualification: सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत न्यायालय आज नार्वेकरांना काय आदेश देणार ?

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नगरहून परळीकडे जात असताना मंत्री धनंजय मुंडे यांचा जामखेड शहरात एकीकडे जोरदार स्वागत व सत्कार करण्यात आले. तर दुसरीकडे मात्र याच सत्कारादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे बॅनर हातात घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजकीय भूमिकेचा निषेध केला. पोलिसांनी तातडीने फलक झळकावणाऱ्या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांनी सत्कार प्रसंगी राजकीय बोलणे टाळत फक्त कार्यकर्त्यांशी हितगुज केले.

राज्याचे कॅबिनेट मंत्री बीड येथे जाण्यासाठी जामखेड येथे गुरवारी येणार असल्याची माहिती समजताच जामखेड तालुक्यातील मंत्री धनंजय मुंडे समर्थक बाजार समितीचे माजी संचालक काकासाहेब गर्जे, मोहा ग्रामपंचायतचे सरपंच शिवाजी डोंगरे, भाजपा विधीसेवा जिल्हाध्यक्ष प्रवीण सानप, बाजीराव गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे तसेच भाजप कार्यकर्ते व समाज बांधवांनी खर्डा चौक परिसरात बॅनरबाजी व स्वागत कमानी लावल्या होत्या.

दुपारी एकच्या दरम्यान मंत्र्याचे आगमन होताच क्रेनला भलामोठा हार मुंडे यांना घालण्यात आला. तसेच काही कार्यकर्त्यांनी हार-पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या भुमिकेचे समर्थन केले. मंत्री मुंडे यांनीही कार्यकर्त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. मात्र या कार्यक्रमात मुंडे यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले.

Dhananjay Munde VS NCP
OBC Reservation : पुन्हा 'तारीख पे तारीख' ; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सुनावणी लांबणीवर

एकीकडे मंत्री धनंजय मुंडे यांचे स्वागत होत असताना त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले व अन्सार पठाण यांनी शरद पवारांच्या समर्थनाचे फलक हातात घेत. मंत्री मुंडे यांच्या भूमिकेचा निषेध करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मात्र तत्काळ या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असताना झटापट झाली. या तिन्ही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते.

मंत्री मुंडे यांचा ताफा बीडकडे पुढे गेल्यानंतर आपण पक्ष स्थापनेपासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहोत. कर्जत-जामखेडमध्ये पक्षाचा लोकप्रतिनिधी नसताना केवळ साहेबांच्या प्रेमाखातर पक्षाचे काम केले. अशा भावना शरद पवार यांच्या समर्थनार्थ पोस्टर झळकवणारे कार्यकर्ते सुरेश भोसले यांनी व्यक्त केल्या.

आता मतदारसंघात रोहित पवारांच्या रूपाने पवार साहेबच आमच्याकडे लक्ष देत असताना काहीजणांनी साहेबांची साथ सोडली. त्यात धनंजय मुंडे हे पण आहेत. त्यामुळे आम्ही आज ते जामखेड शहरातून जात असताना केवळ आम्हाला शरद पवारांचे फोटो दाखवत आमची आजही निष्ठा साहेबांवर असल्याचे दाखवायचे होते, मात्र पोलिसांनी आम्हांला अडवत बळजबरीने ताब्यात घेतले. काहींची निष्ठा दुसरीकडे असेल पण अडचणीच्या काळात निष्ठा दाखवणारा खरा कार्यकर्ता असतो, अशी भावना भोसले यांनी व्यक्त केली.

Edited By-Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com