Mp Imtiaz Jalil : इम्तियाज जलील यांनी 'वंचित'बाबत केलेली 'ती' मागणी ओवेसींनी एका झटक्यात मान्य केली

Loksabha Election 2024 : 2019 च्या निवडणुकीत मला खासदार करण्यात आमच्या दलित बांधवांचा मोठा वाटा होता. त्यांनी जर मला मतदान केले नसते तर मी...
Asaduddin Owaisi, MP IMTIAZ JALIL
Asaduddin Owaisi, MP IMTIAZ JALILSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar: औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) लोकसभा मतदारसंघातून एमआयएम कडून दुसऱ्यांदा निवडणूक लढवणारे खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी गेल्या दोन दिवसांपासून संभाजीनगरमध्ये तळ ठोकून आहेत.

शहरातील शहागंज भागात ओवेसी यांची मंगळवारी (ता.16) सभा सुरू आहे. तत्पूर्वी इम्तियाज जलील यांनी आपल्या भाषणात ओवेसी यांच्याकडे एक मागणी केली आणि ती ऐकून उपस्थितांना धक्काच बसला. पण ओवेसींनी देखील जलील यांची मागणी एका झटक्यात मान्य केली.

Asaduddin Owaisi, MP IMTIAZ JALIL
Lok Sabha Servay News : अजितदादांचे सर्व उमेदवार पडणार; ताज्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज...

ही मागणी म्हणजे वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना अकोला मतदारसंघातून एमआयएम चा पाठिंबा जाहीर करावा. 2019 च्या निवडणुकीत मला खासदार करण्यात आमच्या दलित बांधवांचा मोठा वाटा होता. त्यांनी जर मला मतदान केले नसते तर मी संसदेत दिसलो नसतो. अमरावती लोकसभा मतदारसंघात काल कन्नडलच्या सभेत असदुद्दीन ओवेसी यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे भाऊ आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला.

तसेच अमरावती जिल्ह्यातील एमआयएमच्या सर्व कार्यकर्त्यांना आनंदराज यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावा, असे आदेश दिले. आज संभाजीनगरातून मी ओवेसी यांना आणखी एक विनंती करतो, इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांना खासदार करण्यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा आणि आमच्या दलित बांधवांचा सिंहाचा वाटा होता. त्यांचे माझ्या डोक्यावर कर्ज आहे, असे मी मानतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या कर्जाची आणि उपकाराची परतफेड करण्याची संधी आपल्याला चालून आली आहे. त्यामुळे माझी ओवेसी यांना विनंती आहे की, ज्याप्रमाणे त्यांनी आनंदराज आंबेडकर यांना अमरावतीमध्ये पाठिंबा जाहीर केला. त्याचप्रमाणे अकोला लोकसभा मतदारसंघातही प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर करावा. इम्तियाज जलील यांनी केलेल्या या मागणीचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. आणि विशेष म्हणजे ओवेसींनी देखील जलील यांची मागणी त्याच सभेत पूर्ण केली.

इम्तियाज जलील यांची ही मागणी म्हणजे त्यांचा मास्टर माईंड गेम असल्याचे बोलले जाते. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात दलित मतदारांची संख्या लक्षणीय आहे. ही मते मिळाली तरच इम्तियाज जलील यांचे दुसऱ्यांदा खासदार होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. वंचित आघाडीने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचा फटका एमआयएमला या निवडणुकीत बसू शकतो.

Asaduddin Owaisi, MP IMTIAZ JALIL
Baramati Lok Sabha Constituency : बारामती रिंगणातून शरद पवार लढणार; 'या' संघटनेने दिली उमेदवारी

परंतु कुठल्याही परिस्थितीत गेल्या निवडणुकीत मिळालेली मते आपल्यापासून दुरावू नये यासाठी इम्तियाज जलील यांनी थेट अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्याची मागणी करत स्मार्ट खेळी केल्याचे दिसते. या निर्णयामुळे जलील यांना दलित समाजाची सहानुभूती मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता आंबेडकर यांनी एमआयएमकडे पाठिंब्याची कुठलीही मागणी केलेली नसताना जलील यांनी देऊ केलेला पाठिंबा वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) स्वीकारणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सात महिन्यात म्हणजेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित आघाडीची युती तुटली होती. याचे खापर तेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी इम्तियाज जलील यांच्या माथी फोडले होते. त्यामुळे इम्तियाज यांच्या पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकर काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे हे महत्त्वाचे ठरणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Asaduddin Owaisi, MP IMTIAZ JALIL
Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या मैदानात 'या' वाघिणी फोडताहेत पुरुष प्रतिस्पर्ध्यांना घाम!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com