Shivsena : विरोधी पक्षनेते झाल्यानंतर दानवेंची बंडखोर बोरनारेंच्या मतदारसंघातून एन्ट्री..

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी अधिकृत निवड झाल्यानंतर अंबादास दानवे आज मोटारीने औरंगाबादेत दाखल झाले. विशेष म्हणजे त्याआधी ते वैजापूर या बंडखोर रमेश बोरणारे यांच्या मतदारसंघातूनच आले. (Mla Ambadas Danve)
Mla Ambadas Danve in Vaijapur News
Mla Ambadas Danve in Vaijapur NewsSarkarnama

औरंगाबाद : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होत असतांना दुसरीकडे शिवसेनेने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी अंबादास दानवे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Marathwada) यांच्या विश्वासूपैकी एक असलेल्या दानवेंवर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिंदे बंडानंतर अंबादास दानवे यांनी जिल्ह्यातील (Shivsena) शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, कार्यकर्ते आणि सामान्य शिवसैनिक कसा एकनिष्ठ राहिल यासाठी प्रयत्न केले. वार्डात, शहरात, गावात बैठका घेत संघटनेचा आढावा आणि फेरबांधणी केली.

परिणामी बंडखोर आमदार व त्यांच्या निवडक समर्थकांशिवाय मुळ शिवसेनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षासोबतच राहिले. (Aurangabad) बंडाचा परिणाम तळागाळापर्यंत होऊ नये याची काळजी जिल्हाप्रमुख म्हणून अंबादास दानवे यांनी घेतली. शिवाय बंडखोरांकडून होणाऱ्या टीकेला जशासतसे उत्तरही दिले. याचेच बक्षिस म्हणून उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दानवे यांच्यावर सोपवली. या जबादारीचे ओझे आता दानवे यांना पेलावे लागणार आहेत.

राज्य प्रवक्ते, जिल्हाप्रमुख, आमदार आणि विरोधी पक्षनेते अशा चौरंगी भुमिकेत वावरतांना आगामी काळात जिल्ह्यातील शिवसेना एकसंध ठेवणे आणि त्यातून पक्षाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याची जबाबदारी या निमित्ताने दानवे यांच्यावर आली आहे. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवण्याची भाषा करणाऱ्या दानवेंनी आज त्याची झलकही दाखवली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकताच औंरगाबाद जिल्हा दौरा झाला. तेव्हा त्यांनी दौऱ्याची सुरूवात समर्थक आमदार रमेश बोरनारे यांच्या वैजापूर मतदारसंघातून केली होती. तेव्हा बोरनारे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत शिवसेनेला डिवचले होते. दानवेंनी त्याची परतफेड आज केल्याचे दिसून आले. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी अधिकृत निवड झाल्यानंतर अंबादास दानवे आज मोटारीने औरंगाबादेत दाखल झाले.

Mla Ambadas Danve in Vaijapur News
Fadanvis : खरी शिवसेना आमच्यासोबत, पवारांचे दुःख वेगळे ; फडणवीसांचा टोला

विशेष म्हणजे त्याआधी ते वैजापूर या बंडखोर रमेश बोरणारे यांच्या मतदारसंघातूनच आले. या ठिकाणी अंबादास दानवे यांचे शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात बोरनारे यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाला दानवे यांनी या निमित्ताने उत्तर दिले. विरोधी पक्षनेते पदामुळे दानवे यांची ताकद वाढली असून राज्य पातळीवर देखील या पदामुळे त्यांना मान मिळणार आहे.

कॅबिनेट दर्जाचे हे पद असल्यामुळे याचा वापर वरिष्ठ सभागृहात राज्यातील प्रश्न मांडून सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची मोठी जबाबदारी त्यांना पार पाडावी लागणार आहे. तसेच जिल्हाप्रमुख म्हणून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला हा जिल्हा अभेद्य ठेवण्यासाठी दानवे यांना आता व्यापक भूमिका घ्यावी लागेल. पक्षातंर्गत कुरबूरी, हेवेदावे बाजूला सारून सगळ्यांना सोबत घेत शिवसेनेला गतवैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी देखील दानवे यांच्यावर आता असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com