Beed : आडसकरांचा `हाबाडा` तेव्हापासून राजकारणाच्या डिक्शनरीत, पवारांकडून आठवण..

दिवंगत जेष्ठ समाजवादी नेते बापूसाहेब काळदाते यांचा पराभव केल्यानंतर आडसकर यांनी `हाबाडा`, दिला असा डायलॉग मारला होता. (Ncp Leader Sharad Pawar)
Ncp President Sharad Pawar News, Beed
Ncp President Sharad Pawar News, BeedSarkarnama
Published on
Updated on

बीड : जिल्ह्याने आपल्याला कायम साथ दिली. १९८० च्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच आमदार आपल्या पक्षाचे विजयी झाले. त्या काळात साथ देणाऱ्यांना आजच्या निमित्ताने भेटता आले. (Beed) मात्र, दिवंगत उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके, दिवंगत माजी आमदार गोविंदराव डक, दिवंगत माजी आमदार बाबुराव आडसकर यांची आठवण येत असल्याचे (Sharad Pawar) शरद पवार म्हणाले.

पवार यांचे तत्कालिन सहकारी जेष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात पवार बोलत होते. शरद पवारांच्या विचारांना जिल्ह्याने कायम पाठींबा दिला. (Marathwada) १९८० च्या निवडणुकीत जिल्ह्यात एस. काँग्रेसचे सर्वच आमदार विजयी झाले होते.

आपल्याला साथ दिलेल्या मंडळींना या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटता आल्याचे शरद पवार म्हणाले. मात्र, त्यांनी दिवंगत सुंदरराव सोळंके, दिवंगत गोविंदराव डक व दिवंगत बाबुराव आडसकर यांची आठवणही काढली.

दिवंगत जेष्ठ समाजवादी नेते बापूसाहेब काळदाते यांचा पराभव केल्यानंतर आडसकर यांनी `हाबाडा`, दिला असा डायलॉग मारला होता. हा शब्द तेव्हापासून राजकीय डिक्शनरीत प्रचलीत झाला.

Ncp President Sharad Pawar News, Beed
Beed : दोघांची तिरपी टोपी अन् पिळदार मिशा ; पंडितांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्यात पाटलांची बॅटींग

अनेकदा शरद पवारांनी दिवंगत बाबुराव आडसकरांचा पेहराव, त्यांचे रांगडे वागणे याचे किस्से जिल्हावासियांच्या आठवणीत आणून दिलेले आहेत. अभिष्ठचिंतन सोहळ्यात त्यांनी आवर्जून या जुन्या सहकाऱ्यांची आठवण काढली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com