Dhananjay Munde Political News : धनंजय मुंडेंनी हात जोडल्यानंतरही बीडच्या सभेतून लोकांचा काढता पाय...

NCP Beed Sabha News : '' आजची सभा उत्तरसभा नाही तर...''
Dhananjay Munde
Dhananjay Munde Sarkarnama
Published on
Updated on

Beed : राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर आणि राज्यातल्या नव्या राजकीय समीकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रविवारी (ता. २७) येथे होणारी राष्ट्रवादीची पहिलीच सार्वजनिक सभा होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची १७ ऑगस्टला बीडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी रविवारची सभा होत आहे. या सभेला मोठी गर्दीही जमली आहे.

या सभेत कृषिमंत्री धनंजय मुंडेंचे तडाखेबंद भाषण झाले. आपल्या भाषणानंतर त्यांनी सभा संपेपर्यंत कुणीही उठायचं नाही अशी विनंतीही केली. पण मुंडेंचं भाषण संपताच आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह प्रमुख नेत्यांच्या भाषणाआधीच सभेतून लोकांनी काढता पाय घेतल्याचे दिसून आले.

Dhananjay Munde
Eknath Shinde On Sharad Pawar : अजितदादांना पटलंय ते पवारसाहेबांनाही पटेल; एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य

बीड येथे अजित पवारां(Ajit Pawar) ची रविवारी सभा झाली. छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल येथे होणाऱ्या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदींसह राष्ट्रवादीचे इतर आमदारही उपस्थित होते. पण या सभेत धनंजय मुंडेंचं भाषण झाल्यानंतर लोकं निघून गेली.

धनंजय मुंडे काय म्हणाले...?

कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, बीडच्या सभेत शरद पवार यांनी माझा इतिहास काढला. तर लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे हा माझा इतिहास आहे. माझी कर्तबगारी पवारांच्या पुस्तकात, हाच माझा इतिहास आहे. विधानपरिषदेतील माझ्या कामगिरीचं पवारांच्या पुस्तकात कौतुक केलं आहे. असेही ते म्हणाले.

Dhananjay Munde
Beed politics : राजकीय परिस्थिती विचित्र ; धुरळा शांत होऊ द्या मग निर्णय घेऊ : जयदत्त क्षीरसागरांची सावध भूमिका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच 2019 च्या पहाटेच्या शपथविधीवर मुंडेंनी मिश्किल टिप्पणी केले. मला पहाटे उठण्याची सवय नाही,त्यामुळे 2019 चं मला माहित नाही. तसंच 2017 चं माहिती नाही असे ते म्हणाले.

आजची सभा उत्तरसभा नाही तर

"मला अनेकांनी विचारले की, 27 तारखेची सभा 17 तारखेला झालेल्या सभेला उत्तर आहे का? मी नम्रपणे सांगितले की ही उत्तर सभा नाही तर ही सभा उत्तरदायित्वाची सभा आहे असेही मुंडे यावेळी म्हणाले. तसेच सभा संपेपर्यंत कुणीही जागेवरुन उठू नये अशी हात जोडून विनंती केली पण तरीदेखील काही लोकं सभास्थळाहून बाहेर पडले.

धनंजय मुंडे यांनी शरद पवारां(Sharad Pawar) वर बीडच्या सभेत टीका केली आहे. "जिल्ह्याने साहेबांना भरपूर प्रेम दिले पण जिल्ह्यातील जनतेला शरद पवारसाहेबांनी काय दिले हा प्रश्नचिन्ह आहे अशी टीका मुंडेंनी पवारांवर केली.

Dhananjay Munde
Nana Patole News : दंगली आणि दलित अत्याचाराचे गुजरात मॉडेल महाराष्ट्रात राबवण्याचा भाजपचा डाव ; नाना पटोलेंचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच बीडमध्ये सभा घेतली. त्यानंतर अजित पवार यांची सभा बीडमध्ये होत आहे. या सभेला प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित आहेत. अजित पवार हे शरद पवार यांच्या बीडमधील सभेनंतर ही सभा घेत असल्याने अजित पवार काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com