Shivaji Kalge News : देशमुख काका-पुतण्याचा सिग्नल अन् काळगेंना लोकसभेचं तिकीट!

Latur Lok Sabha Constituency : काही काळासाठी भाजपसाठी हा मतदारसंघ सुरक्षित वाटत असताना इथे आता तगडी फाइट होणार असल्याचे दिसत आहे.
Shivaji Kalge
Shivaji KalgeSarkarnama

Latur Congress News लातूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून डॉ. शिवाजी बंडप्पा काळगे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. स्थानिक उमेदवार, नवा चेहरा, जातीय समीकरणे आणि कोरी पाटी या आधारे माजी मंत्री जिल्ह्यातील काँग्रेसचे बडे नेते दिलीपराव देशमुख व आमदार अमित देशमुख या काका पुतण्यांनी सिग्नल दिल्यानंतर घाडगे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. जातीय समीकरणाचा डाव आणि उच्चशिक्षित उमेदवार देत काँग्रेसने धक्का तंत्राचा वापर केल्याचीही चर्चा आहे.

लातूर लोकसभेसाठी शिवाजी काळगे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होताच त्यांच्या मूळ गावी अंकुलगा- राणी (ता. शिरूरअनंतपाळ) येथे जल्लोष करण्यात आला. लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने सर्वप्रथम माजी खासदार सुधाकर शिंगारे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर काँग्रेस कोणाला मैदान उतरवणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. मात्र, काही काळ वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहिलेल्या काँग्रेसने स्थानिक आणि नवा चेहरा देत भाजपलाही धक्का दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shivaji Kalge
Loksabha Election 2024 : धाराशिवमध्ये सत्ताधारी-विरोधकात शिमगा; आरोप- प्रत्यारोपांची धुळवड!

लातूर लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी काँग्रेसकडून प्रदीर्घ काळ प्रतिनिधित्व केले आहे. चाकूरकर हे लिंगायत समाजाचे असल्यामुळे जिल्ह्यामध्ये या समाजाचे वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे पूर्व इतिहासाची व जातीय समीकरणाची जोड या उमेदवारीला देण्यात आली आहे.

माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील चाकूरकर यांचाही भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यांना लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची शक्यता वर्तवली जात आहे. भविष्यात शहर मतदारसंघातून जातीय समीकरणाची अडचण होऊ नये म्हणून लिंगायत समाजाची साथ व्हावी व अमित देशमुख यांना विधानसभा जड जाऊ नये म्हणूनच या उद्देशाने ही उमेदवारी महत्त्वाची मानली जात आहे.

स्वतः अमित देशमुख यांनी या उमेदवारीसाठी सर्वाधिक प्रतिष्ठा पणास लावून उमेदवारी घेतली असल्याचे बोलले जात आहे. यासाठी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनीही सिग्नल दिले असून, आता भाजपच्या हॅट्ट्रिकला ब्रेक बसणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. काही काळासाठी भाजपसाठी हा मतदारसंघ सुरक्षित वाटत असताना इथे आता तगडी फाइट होणार आहे.

विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांची पुन्हा उमेदवारी घोषित झाली आहे. त्यांच्यावरील नाराजीचा फायदा काँग्रेस उमेदवाराला होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. या मतदारसंघातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस हा फारसा सक्रिय दिसत नव्हता. भाजपसाठी विजय मिळवून देणारा असा लातूर मतदारसंघ वाटत असताना काँग्रेस पक्षाने अचानक डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी देऊन भाजपच्या  यशात मोठा अडथळा निर्माण केला आहे.

Shivaji Kalge
Chandrakant Khaire News : 'महायुतीत मारामाऱ्या, संभाजीनगरात मशालच पेटणार' ; चंद्रकांत खैरेंचा दावा!

शिवाजी काळगे हे नेत्रतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. शिवाय राणी अंकुलगा, ता. शिरूरअनंतपाळ येथील ते रहिवाशी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण राणी अंकुलगा, माध्यमिक केंद्र लातूर, उच्च माध्यमिक शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे झाले आहे. विविध संघटनावर पदाधिकारी, सदस्य असलेले डॉ. शिवाजी काळगे यांचा लातूर-नांदेड जिल्ह्यात मोठा मित्र परिवार आहे.

काँग्रेस पक्षाने शांत बसून अचानक त्यांच्या नावाची घोषणा करून मतदारसंघात चुरस निर्माण केली आहे. देशमुख कुटुंबीयांनी या मतदारसंघात मनापासून लढायचे ठरवून स्थानिक व  'दृष्टी'वाला उमेदवार दिल्याची चर्चा या निमित्ताने लातूर जिल्ह्यात होत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतही काळगे यांचे नाव उमेदवारीच्या शर्यतीत होते. परंतु तेव्हा मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी देण्यात आली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com