BJP cabinet expansion : भाजप 'शिवीगाळ अन् अर्वाच्च भाषा' नावाचे मंत्रालय स्थापन करणार; अतुल लोंढेंचा नेमका कोणाला टोला?

Congress Atul Londhe BJP Kokan MLA Nitesh Rane swearing in minister mahayuti government : कोकणातील भाजप नेते आमदार नीतेश राणे यांना शपथविधीसाठी आलेल्या फोनवरून काँग्रेस प्रदेश कमिटीचे अतुल लोंढे यांचा भाजपला खोचक टोला.
Atul Londhe
Atul LondheSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी सोहळा थोड्याच वेळात होईल. महायुतीमधील संभाव्य आमदारांना मंत्रि‍पदाच्या शपथेविधीचे निमंत्रण देण्यात आले आहे.

यात कोकणातील भाजप नेते आमदार नीतेश राणे यांना देखील शपथविधीचे निमंत्रण आहे. यावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे. अतुल लोंढे यांनी याबाबत 'एक्स' खात्यावर पोस्ट शेअर केली आहे.

काँग्रेसचे (Congress) अतुल लोंढे यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर शेअर पोस्टमध्ये, 'भाजपकडून कोकणातील एका आमदाराला मंत्रि‍पदासाठी फोन गेल्याचे ऐकिवात आहे. कदाचित कदाचित भाजप सरकारने शिवीगाळ व अर्वाच्च भाषा नावाचे मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे', असा टोला अतुल लोंढे यांनी त्यांच्या पोस्टमधून लगावला आहे. या पोस्टचा रोख त्यांचा आमदार नीतेश राणे यांच्याकडे आहे. अतुल लोंढेंनी पोस्टमध्ये राणेंचे नाव न घेता भाजपला डिवचलं आहे.

Atul Londhe
Top 10 News : मंत्रि‍मंडळाचा विस्तार, महायुतीत मंत्रीपद कोणाकोणाला? राऊतांची धनंजय चंद्रचूड यांच्याबाबत मोठी मागणी- वाचा महत्त्वाचा घडामोडी

भाजपचे (BJP) आमदार नीतेश राणे यांची विरोधकांवर टीका करताना, टोकाची भाषा वापरतात. हिंदुत्वाच्या मुद्यावर नेमकी आक्रमक असतात. सकल हिंदू समाजाचे राज्यात निघालेल्या मोर्चांमध्ये मुस्लिमांवर टीका करताना, त्यांची भाषा जहाल असते. यातून अनेकदा जातीय, धार्मिक तेढ वाढते. याशिवाय ठाकरे पिता-पुत्रांवर अगदी खालच्या एकेरी भाषेत टीका करतात. त्यामुळे ते नेहमी चर्चेत असतात. यातच त्यांना भाजपकडून महायुती सरकारमध्ये मंत्रि‍पदावर संधी देण्यात येत आहे. यावर काँग्रेसने निशाणा साधला आहे.

Atul Londhe
Radhakrishna Vikhe : सलग आठवेळा आमदार; काँग्रेस-शिवसेना व्हाया हिंदुत्ववादी भाजप, आता पुन्हा मंत्री!

भाजपला मिळणार 20 मंत्रि‍पद

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आज 39 मंत्री शपथ घेणार आहेत. आज मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या महायुतीच्या आमदारांची नावं समोर आली आहेत.  भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 मंत्रि‍पदे आली आहेत. 

भाजपकडून कोणा कोणाला मंत्रि‍पदावर संधी

नीतेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत पाटील, पंकज भोयर, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, अतुल सावे, जयकुमार गोरे, माधुरी मिसाळ, चंद्रशेखर बावनकुळे, संजय सावकारे, अशोक उईके, आकाश फुंडकर, आशिष शेलार यांना मंत्रिपदावर संधी मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com