Shivsena News : लोकसभेच्या पराभवानंतर संभाजीनगरात ठाकरे गटातून 'आउटगोइंग' सुरू !

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : शिंदे गटात गेलेले प्रतिभा जगताप, गजानन मनगटे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या समर्थक म्हणून ओळखले जात होते. त्यांनीच आता शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Thackeray ShivSena  Sambhajinagar
Thackeray ShivSena SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : लोकसभा नुकत्याच झालेल्या निवडणुकीत संभाजीनगर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे सलग दुसऱ्यांदा पराभूत झाले. या पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

ठाकरे गटाच्या महिला जिल्हा संघटक प्रतिभा जगताप आणि माजी नगरसेवक गजानन मनगटे यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. विशेष म्हणजे शिंदे गटात गेलेले हे दोघे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश आमदार शिंदे सोबत गेले होते. कन्नड विधानसभा मतदारसंघाचे उदयसिंह राजपूत यांचा अपवाद वगळता ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडेल,असे बोलले जात होते. शिंदे गटाकडून तसे प्रयत्नही झाले. मात्र कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. त्यामुळे ठाकरे गटाला सुरुंग लावण्यात शिंदे यांच्या शिवसेनेला संभाजीनगर फारसे यश मिळाले नव्हते. मात्र लोकसभा निवडणुकीतील सलग दुसऱ्या पराभवानंतर पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आता चलबिचल सुरू झाली आहे.

Thackeray ShivSena  Sambhajinagar
Amit Thackeray : 'बिनशर्ट' वरुन अमित ठाकरेंनी काका उद्धव यांना सुनावले, म्हणाले...!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या महिला जिल्हा संघटक प्रतिभा जगताप आणि माजी सभागृह नेता नगरसेवक गजानन मनगटे यांनी पश्चिमचे आमदार तथा शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरे गटासाठी हा धक्का समजला जात आहे. प्रतिभा जगताप या अनेक वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत होत्या. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या समर्थक म्हणून त्या ओळखल्या जात होत्या. त्यांनीच शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत सलग दुसरा पराभव होऊन शिवसेनेचे चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर गेल्यामुळे शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व नेत्यांमध्ये मरगळ आल्याचे बोलले जाते. याशिवाय चंद्रकांत खैरे व अंबादास दानवे या दोन नेत्यांमध्ये असलेले वैर निवडणुकीतील पराभवानंतरही संपण्याची कोणती चिन्हे दिसत नाहीत.

अशावेळी ठाकरे गटातील पदाधिकारी शिंदे सेनेच्या वाटेवर जात असल्याचे चित्र यावरून दिसून येत आहे. मध्यंतरीच्या काळात मोजके पदाधिकारी शिंदे गटात गेले होते. तेही व्यावसायिक संबंध असल्यामुळे संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या शब्दावर विश्वास ठेवून पक्ष सोडून गेले होते. मात्र मोठा गट किंवा मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते फोडण्यात शिंदे गटाला आतापर्यंत यश आलेले नाही.

Thackeray ShivSena  Sambhajinagar
CM Eknath Shinde : शिंदेसाहेब, आपण कुटुंबप्रमुख आहात, मत न दिलेल्यांचेही मुख्यमंत्री आहात!

परंतू लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटाला गळती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाने ताकतीने विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. अशावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करणे हे काही शुभ संकेत नसल्याचे बोलले जाते. मुंबईत छत्रपती संभाजीनगर उबाठा गटाच्या महिला आघाडी जिल्हासंघटक प्रतिभा जगताप व माजी नगरसेवक गजानन मनगटे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यानंतर ठाकरे गटाचे आणखी काही पदाधिकारी गळाला लागतात का? यासाठी शिंदे गट प्रयत्न करणार आहे. ठाकरे गटातून सुरू झालेले हे आउटगोइंग शिवसेना नेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे रोखण्यात यशस्वी होतात का?याकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com