Amit Thackeray : 'बिनशर्ट' वरुन अमित ठाकरेंनी काका उद्धव यांना सुनावले, म्हणाले...!

Amit Thackeray responded Uddhav Thackeray : राज ठाकरे यांनी जो पक्ष काढला तो स्वतःच्या हिमतीवर काढला आहे. पक्ष मोठा व्हायला वेळ लागला असेल तरी तो आपल्या मेहनतीवर काढलेला पक्ष आहे, हे कुणी विसरू नये.
Uddhav Thackeray - Amit Thackeray
Uddhav Thackeray - Amit ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला दिलेल्या पाठींब्याचा कडक शब्दात समाचार घेत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात 'बिनशर्ट' पाठींबा असे म्हणत खिल्ली उडविली होती. यावर आता राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आपले काका उद्धव यांना सुनावले आहे. वरळीत पाच वर्षापूर्वी जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा त्यांनी तो घेतला आणि मुलाला आमदार केलं, असे प्रत्युत्तर अमित ठाकरेंनी दिले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना महायुतीला मनसेने पाठींबा दिला होता. मुंबई येथे झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठींबा देत असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीच्या उमेदवारांचे काम केले होते. मात्र त्याचा फारसा प्रभाव निवडणुकीमध्ये पडल्याचे दिसले नाही. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागांची पिछेहाट झाल्याचे पहायला मिळाले.

Uddhav Thackeray - Amit Thackeray
MNS Reply to Uddhav Thackeray : 'हिरव्या मतांमुळे काही जागा जिंकणाऱ्यांना..' ; उद्धव ठाकरेंवर 'मनसे'चा पलटवार!

शिवसेना वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर कडक शब्दात टीका केली होती. 'बिनशर्त' पाठिंबा नव्हे 'बिनशर्ट' पाठिंबा अशी खिल्ली उद्धव ठाकरेंनी उडविली होती. या टीकेनंतर मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी त्याला उत्तर दिले होते. त्यानंतर आता राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे युवासेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी यावर भाष्य करत उद्धव ठाकरेंना सुनावले आहे.

पाच वर्षापूर्वी वरळीमध्ये त्यांना बिनशर्त पाठिंबा दिले तेव्हा त्यांना काही वाटलं नाही. त्यांनी तो घेतला आणि मुलाला आमदार केलं. या गोष्टी विसरायला नकोत, असे अमित ठाकरे म्हणाले. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जो पक्ष काढला तो स्वतःच्या हिमतीवर काढला आहे. पक्ष मोठा व्हायला वेळ लागला असेल तरी तो आपल्या मेहनतीवर काढलेला पक्ष आहे, हे कुणी विसरू नये. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही आमची शक्ती दाखवू, अशा शब्दात त्यांनी काका उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

Uddhav Thackeray - Amit Thackeray
Raj Thackeray Politics : विधानसभा निवडणुकीबाबत मनसेचे 'राज' केव्हा स्पष्ट होणार?

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे

शिवसेना वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे म्हणाले होते, लोकसभा निवडणुकीमुळे मित्र कोण, शत्रू कोण समोर आले. काहींनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून ‘बिन-शर्ट’ पाठिंबा दिला. उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा. तर काहींनी भाजपाला विरोध करण्याचे नाटक करून पाठिंबा दिला.आम्ही नाटक करणारी माणसं नाही. नाटक ही कला आहे. ही कला मोदींना जमते आम्हाला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com