Mahayuti News : शिंदे-फडणवीसांच्या आदेशानंतर संभाजीनगरात महायुतीचे स्थानिक नेते एकत्र बसणार

Loksabha Election 2024 : मराठवाड्यात सर्व जागा जिंकण्याचा महायुतीचा मानस आहे.
Devendra Fadnavis-Eknath Shinde-Ajit Pawar
Devendra Fadnavis-Eknath Shinde-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : आगामी लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरची जागा महायुतीतील कोणता पक्ष लढवणार, हे अद्याप स्पष्ट नसले तरीही राज्यातील लोकसभेच्या सर्व 48 जागा महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय देशपातळीवर झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मिशन 45 चे उद्दिष्ट गाठण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. विशेषतः मराठवाड्यात सर्व जागा जिंकण्याचा महायुतीचा मानस आहे. (After the order of Shinde-Fadnavis, local leaders of Mahayuti will sit together in Sambhaji Nagar)

राज्यात शिवसेना-भाजप युती आणि त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या ट्रीपल इंजिन सरकारमध्ये स्थानिक पातळीवर फारसा समन्वय नसल्याचे दिसून आले. तीनही पक्षांनी आपापली स्वतंत्र तयारी करीत संघटनात्मक बांधणीवर जोर दिला आहे. आता लोकसभा निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आल्यानंतर राज्यातील सत्ताधारी प्रमुख नेत्यांनी महायुतीतल्या स्थानिक नेत्यांना एकत्र येण्याची साद घातली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis-Eknath Shinde-Ajit Pawar
Nashik Loksabha : लोकसभा इच्छुकांचे मराठा आरक्षण अन्‌ अध्यक्षांच्या निर्णयाकडे डोळे

छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आज महायुतीच्या स्थानिक नेत्यांची पहिली बैठक होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीनही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांसह स्थानिक पदाधिकारी या बैठकीत आपापली मते मांडणार आहेत. या बैठकीचा पुढचा टप्पा हा विधानसभानिहाय पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांचा असणार आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर महायुतीतील तीनही घटकपक्षांनी दावा सांगितला आहे. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी आणि भाजप अशा तीनही पक्षांकडे इच्छुकांची गर्दी आहे. शिवसेना-भाजप युतीमध्ये ही जागा कायम शिवसेनेने लढवली असल्यामुळे पहिला दावा शिंदे गटाचा मानला जातो. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोहयोमंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, मंत्री अब्दुल सत्तार या तिघांनीही लोकसभा लढवण्याची तयारी दर्शवली आहे.

Devendra Fadnavis-Eknath Shinde-Ajit Pawar
Nanded OBC Rally : भुजबळांच्या अनुपस्थितीत आंबेडकरांनी गाजवला नांदेडचा ओबीसी मेळावा; भाजपवर हल्लाबोल

शिवसेनेचे माजी खासदार आणि विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल यांनीही ‘मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला, तर मीही तयार आहे,’ असे संकेत यापूर्वीच दिले आहेत. दुसरीकडे, भाजपचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी संभाव्य उमेदवार म्हणून गेल्या वर्षभरापासून तयारी सुरू केली आहे.

Devendra Fadnavis-Eknath Shinde-Ajit Pawar
Salunkhe On ShahajiBapu : ‘सांगोल्याचा पुढचा आमदार मी किंवा शहाजीबापूच; इतरांनी भ्रमात राहू नये’ साळुंखेंचा इशारा कोणाला?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नसली तरी अजित पवार गटाकडून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचे नाव पुढे केले जात आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच महायुतीतील घटकपक्ष एकत्रित बसणार असल्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Vijay Dudhale

R...

Devendra Fadnavis-Eknath Shinde-Ajit Pawar
Solapur Hindu Akrosh Morcha : महाराष्ट्र के ‘सीएम’ने ‘योगीजी’के ॲंगलसे कारवाई करनी चाहिए; दगडफेकीवर टी. राजांचा सल्ला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com