Mla Kailas Patil News : विठ्ठलाच्या दर्शनातूनच जनतेची कामे करण्याचे बळ मिळते..

Marathwada : माझ्या सहकार्यासोबत दर्शनासाठीचा हा प्रवास प्रचंड उर्जा देणारा असतो.
Mla Kailas Patil News
Mla Kailas Patil News Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv : पंढरीच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त असलेले अनेक राजकीय नेते, पुढारी, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आपआपल्या परीने वारीची परंपरा जतन करत असतात दिसतात. (Mla Kailas Patil News) अशीच काहीशी परंपरा आमदार कैलास पाटीलही गेल्या कित्येक वर्षांपासून जपत आहेत. गावचे सरपंच ते आता आमदार झाल्यानंतर पंढरपुरची वारी ते चुकवत नाहीत. विशेष म्हणजे गावकर्‍यांना सोबत घेऊन तेव्हापासून आतापर्यंत त्यांची वारी सुरु आहे.

Mla Kailas Patil News
Divisional commissioner News : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी घेतली स्वेच्छा निवृत्ती ..

आज सकाळी आपल्या गावच्या मंडळीसोबत एका टँम्पोत बसुन ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. (Kailas Ghadge Patil) कैलास पाटील साधारण २००६ मध्ये सारोळा गावचे पहिल्यांदा सरपंच झाले. तेव्हा त्यांनी आपल्या सर्व सहाकार्‍यांसोबत विठुरायाच्या दर्शनासाठी जायचा निर्णय घेतला. (Shivsena) तेव्हापासून ते दरवर्षी वाहनातुन जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊन येतात. पुढे २०१७ साली ते जिल्हा परिषद सदस्य झाले तेव्हाही त्यांनी हा प्रवास सुरुच ठेवला.

२०१८ साली त्यांच्यावर शिवसेनेनं जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपविली. तरीही वारी काही चुकु दिली नाही. पुढे २०१९ ला तर आमदार झाले तेव्हा अनेकांना वाटले आता वारी होईल की नाही? मात्र आमदारांनी आपली परंपरा कायम ठेवली. (Osmanabad) यंदाही त्यांनी गावकर्‍यांना सोबत घेऊन पंढरीची वाट धरली आहे. विठ्ठलाचा भक्त सामान्यापासुन आमदार, मंत्री म्हणजे अगदी समाजाच्या सगळ्याच थरातील पाहयला मिळतो.

कितीही काम असले तरी यावेळी मी फक्त विठ्ठलाचा सामान्य भक्त म्हणुन जातो. मला सुरुवातीपासुन राजकारणात ज्यांनी सहकार्य केले, त्या माझ्या सहकार्यासोबत दर्शनासाठीचा हा प्रवास प्रचंड उर्जा देणारा असतो, अशा भावना कैलास पाटील यांनी या निमित्ताने व्यक्त केल्या. मी आमदार होतानाच जनतेलाच दैवत मानून काम करणार, असा शब्द दिला होता. तसेच काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. पण त्याच बळ मला या विठ्ठलाच्या दर्शनातून मिळतं, असेही पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com