Corporation Election : महापालिका इच्छुकांकडून चमकोगिरी, संबंध नसलेल्या कामाचे श्रेय घेणाऱ्या पोस्ट अन् रिल्सचा धुमाकूळ!

Municipal Corporation Election : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातल्या रखडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकी झाल्या असून आता महापालिका निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Municipal Corporation Election
Municipal Corporation Electionsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कोविड आणि आरक्षणाशी संबंधित विलंबामुळे, जवळजवळ आठ ते नऊ वर्षांनंतर अखेर महापालिका निवडणुका होणार आहेत.

  2. उत्साहित आणि अस्वस्थ असलेल्या इच्छुकांनी सोशल मीडियावर आक्रमकपणे स्वतःचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे.

  3. फोटो सेशन, रील्स आणि असंबंधित कार्यक्रमांमध्ये उपस्थिती वाढली आहे, ज्यामुळे सोशल मीडिया स्पर्धात्मक निवडणूक रणांगण बनला आहे.

Parbhani News : कोरोना आणि त्यानंतर आरक्षणावरील आक्षेपामुळे रखडलेल्या महापालिका निवडणुका होण्याचा मार्ग आता मोखळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुक आयोगाला ३१ जानेवारीपर्यंत निवडणुका घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आठ-नऊ वर्ष वाट पहावी लागल्याने इच्छुक अधिकत उतावळे झाले आहेत. निवडणुकीचा बिगुल कधीही वाजू शकतो हे लक्षात घेऊन इच्छुकांनी चमकोगिरी सुरू केली आहे. ज्या कामांशी आपला संबंध नाही, तिथे जाऊन फोटोसेशन, रिल्स बनवून त्या सोशल मिडियावर व्हायरल करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.

भावी नगरसेवक जणू आपण निवडून आलो आहोत, अशा आविर्भावात शहरात सुरु असलेल्या अनेक विकास कामांच्या ठिकाणी जाऊन धडकत आहेत. कामाचा दर्जा, मेजरमेंट अशा गोष्टींवर आक्षेप घेत कंत्राटदार, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी नडण्याचे प्रकारही परभणी शहरात घडतांना दिसत आहेत. रिल्स आणि फोटोसेशनचे हे फॅड इतके फोफावले आहे, की सर्वसामान्य नागरिकही या चमकोगिरीला वैतागले आहेत.

अखेर महानगरपालिका निवडणूकांचे बिगूल वाजणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता भावी नगरसेवकांमधील सामाजिक कार्यकर्ता चांगलाच जागा झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. त्यातच शहरात जी काही विकासकामे सुरु आहेत, त्या सर्वांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न अनेक इच्छुक उमेदवारांकडून घेण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यासाठी समाजमाध्यमांवर फोटो, रिल्सचा भडीमार केला जात आहे. या श्रेयवादाच्या लढाईचा अतिरेक सुरू झाल्याने सर्व सामान्य नागरीकांकडून या प्रकाराचे कौतुक होण्याऐवजी संताप व्यक्त केला जात आहे.

Municipal Corporation Election
Municipal Corporation Elections : मुंबई महापालिकेसाठी महायुती; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मात्र भाजप स्वतंत्र चूल मांडणार?

शहराच्या विविध भागात महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, भारत संचार निगमकडून वेगवेगळी कामे केली जात आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु असलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण इच्छुकांसाठी पर्वणी ठरू लागले आहे. शहरात ठिकठिकाणी सुरु असलेल्या या कामांना इच्छुक मोठ्या संख्येने भेट देत असून रस्त्यासह, कंत्राटदार, अधिकाऱ्यांसह पाहणी करत आहेत.

याचे फोटो, व्हिडिओ काढून त्याच्या रिल्स आपआपल्या प्रभागांच्या व्हॅट्सअॅपग्रुपवर तसेच अन्य समाज माध्यमावर पोस्ट करत आहेत. विशेष म्हणजे अनेकांचे या रस्त्याशी, त्यांच्या मंजुरीशी, निधी आणण्याशी काडीमात्र संबंध नाही. तरीही श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. अनेक जण तर अधिकारी, कंत्राटदार यांच्याशी तांत्रिक बाबींवर चर्चा करतांना दिसतात. काही अधिकाऱ्यांना, कंत्राटदाराना समज देणे, तर कुठे गळाभेट घेण्याचे प्रकारही सुरू आहेत.

काही जण तर प्रसिध्दी मिळवण्यासाठी रस्त्याच्या जाडी, रुंदी विषयी देखील आक्षेप घेत कुठे कामे रोखण्याचा प्रयत्नही करत आहेत. विरोध झाला तर आंदोलनाचा इशारा देत अॅक्शनमोडमध्ये जात असल्याने कंत्राटदार, संबंधित विभागाचे अधिकारी डोक्याला हात मारून घेत आहेत. महावितरण, महापालिकेकडून काही कामे ही नियमितपणए केली जातात. रोहित्राची देखभाल दुरुस्ती, फ्युज बदलणे, बॉक्स बदलणे ही कामे महावितरण कंपनीच्या नित्याचा भाग आहे. त्याचेही श्रेय घेण्याचा प्रयत्न या भावी नगरसेवक, इच्छुकांकडून सुरु आहे.

Municipal Corporation Election
Municipal Corporation Election: महागाई वाढली हो..! महापालिका निवडणुकीचा खर्च अडीच पटीनं वाढला

FAQs :

1. महापालिका निवडणुका एवढ्या वर्षांनी का होत आहेत?
कोरोना आणि आरक्षणासंबंधी दाखल झालेल्या आक्षेपांमुळे निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या गेल्या.

2. इच्छूक सोशल मीडियावर इतके सक्रिय का झाले आहेत?
निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात, त्यामुळे मतदारांमध्ये आपली छाप पाडण्यासाठी इच्छूक सोशल मीडियावर प्रचार सुरू करत आहेत.

3. ‘चमकोगिरी’ म्हणजे नेमकं काय?
ज्या कार्यक्रमांशी आपला संबंध नाही तिथे जाऊन फोटो काढणे, व्हिडिओ बनवणे आणि ते व्हायरल करणे हीच चमकोगिरी.

4. सोशल मीडियावर प्रचाराचा फायदा होतो का?
होय, तरुण मतदार मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर असतात, त्यामुळे दृश्यमानता वाढते.

5. निवडणूक बिगुल केव्हा वाजेल?
निवडणुकीची अधिकृत घोषणा कधीही होऊ शकते, कारण सर्व तांत्रिक अडथळे दूर झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com